AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलाची उसळी, पेट्रोल-डिझेल झाले महाग

Petrol Diesel Rate Today : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इंधन स्वस्ताईचे किती पण दाखले देत आहेत. प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यात कंपन्यांनी कोणतीच मोठी कपात केली नाही. आता तर जागतिक बाजारात कच्चा तेलाने उसळी घेतली आहे, काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव..

Petrol Diesel Rate Today : कच्चा तेलाची उसळी, पेट्रोल-डिझेल झाले महाग
आजचा भाव काय
| Updated on: Jul 09, 2023 | 8:40 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय तेल कंपन्या प्रचंड फायद्यात आहे. त्यांना यापूर्वी केंद्र सरकारने नुकसान भरपाईसाठी भलंमोठे अनुदान दिले आहे. रशियाने कमी किंमतीत कच्चा तेलाचा (Crude Oil) पुरवठा केला. तेल कंपन्यांनी कच्चा तेलावर प्रक्रिया करुन ते युरोपला विकले. त्यातून नमा कमावला. गेल्या एक वर्षांपासून भारतीय बाजारात या कंपन्या महागडे पेट्रोल-डिझेल विक्री करत आहे. त्यातून कंपन्यांना गब्बर झाल्या आहेत. कंपन्यांची पाचही बोटं सध्या तुपात आहे. केंद्र आणि राज्य सरकार पण इंधनावरील करामुळे मालामाल झाले आहे. पण खरी कसोटी लागली आहे ती सर्वसामान्यांची. त्यांना रोज महागाईला तोंड द्यावे लागत आहे. आता तर कच्चे तेलाचे दर वधारल्याने कंपन्या पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) कपातीचे नाव घेणार नाही, असे दिसते. काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव..

सकाळीच केले भाव अपडेट भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर केल्या. सकाळी 6 वाजता इंधनाचे भाव अपडेट करण्यात आले. जून 2017 पूर्वी 15 दिवसांनी इंधनाच्या किंमती अपडेट करण्यात येत होत्या. आता कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात.

कच्चा तेलाची उसळी जागतिक बाजारात कच्चा तेलाने उसळी घेतली. 9 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 78.47 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 73.86 डॉलर प्रति बॅरलवर आले. भावाची 80 डॉलरकडे आगेकूच सुरु आहे. गेल्यावर्षीपेक्षा हे भाव कमी आहेत.

गेल्यावर्षीची काय होती किंमत गेल्यावर्षी रशिया-युक्रेन युद्ध भडकले. कच्चे तेलाचे भाव मार्च 2022 मध्ये गगनाला भिडले.. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या. नवीन वर्षात, 2023 मध्ये कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली नाही. भाव एकदाच 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. पण अनेक महिने किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.

मोठा नफा भारतीय तेल कंपन्या गेल्या वर्षभरापासून फायद्यात आहेत. मे 2023 पर्यंत या कंपन्यांनी कमीत कमी 7.17 अब्ज डॉलरची बचत केली आहे. ही बचत म्हणजे कमाईच केली आहे. इंडियन एक्सप्रेसने भारतीय कॉमर्स मंत्रालयाच्या रिपोर्टआधारे ही आकडेवारी दिली आहे. रिपोर्टमध्ये गेल्या 14 महिन्यांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.53 तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.75 पेट्रोल आणि डिझेल 92.21 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.43 आणि डिझेल 93.95 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.35 तर डिझेल 93.84 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.14 तर डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.86 रुपये आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.79 तर डिझेल 95.21 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.01 आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.91 आणि डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.32 रुपये तर डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.38 रुपये तर डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.