Crypto Currency | ऐतिहासिक निर्णय! Bitcoin ETF ला मिळाली मंजूरी, गुंतवणूकदारांचा भांगडा

Crypto Currency | क्रिप्टो करन्सीवर जीवपाड प्रेम करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची सकाळ आनंदवार्ता घेऊन आली आहे. क्रिप्टो करन्सीत अनेक भारतीयांनी गुंतवणूक केली आहे. Bitcoin ETF ला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना जणू शंभर हत्तीचं बळ मिळाले आहे.

Crypto Currency | ऐतिहासिक निर्णय! Bitcoin ETF ला मिळाली मंजूरी, गुंतवणूकदारांचा भांगडा
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 10:10 AM

नवी दिल्ली | 11 जानेवारी 2024 : तर क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणूकदारांना भांगडा करायला लावणारी अपडेट समोर आली आहे. क्रिप्टो करन्सीत प्रत्येक देशाने एक धोरण आखले आहे. भारताने क्रिप्टो करन्सनीवर बंदी आणली नसली तरी, या चलनाला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. केवळ कर वसूलीपुरताच केंद्र सरकारचा या चलनाशी संबंध येतो. पण अमेरिकेत इतिहास घडला आहे. अमेरिकेतील बाजार नियंत्रकांनी Bitcoin ETF ला कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक महासत्तेमधीलच नाही तर जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वारे आहे.

अन् घेतला यूटर्न

तर प्रत्येक देशाला क्रिप्टोवर तसा फारसा भरवसा नाही. कारण ते नियमाधीन चलन नाही. त्यात कोणीही सहज फिक्सिंग करु शकतं, असा दावा जवळपास सर्वच केंद्रीय यंत्रणांचा आहे. अमेरिकेतील सिक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशनने यापूर्वी याच कारणास्तव बिटकॉईन ईटीएफला मान्यता देण्यास नकार दिला होता. पण परिस्थिती बदलली, धोरणात अमुलाग्र बदल झाला आणि आता अमेरिकेतील या नियंत्रकाने exchange-traded funds (RTFs) ला मान्यता देऊन टाकली. त्यामुळे गुंतवणूकदारांना आता थेट यामध्ये गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला.

हे सुद्धा वाचा

11 अर्जदारांना दिलासा

अमेरिकन सिक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशनने बिटकॉईन ईटीएफसह BlackRock, Ark Investments/21Shares, Fidelity, Invesco, VanEck, आणि इतर 11 अर्जदारांना दिलासा दिला. त्यांना बाजारात व्यापार करण्याची परवानगी दिली. यातील काही फर्म तर आजपासूनच ट्रेड करु शकतील. त्यात गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल.

कायदेशीर लढा

Grayscale Investments ने अमेरिकन सिक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशनविरोधात न्यायालयीन लढा दिला. त्यांनी फेडरल कोर्टात कमिशनच्या भूमिकेविरोधात धाव घेतली होती. कमिशनला बिटकॉईन ईटीएफ नाकारण्याचे योग्य कारण सविस्तरपणे मांडता आले नाही, असे मत मांडत कोर्टाने ग्रेस्केलच्या बाजूने निकाल दिला होता. आता संस्थागत गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बिटकॉईनच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येईल. क्रिप्टो करन्सी बाजाराला हा एक मोठा दिलासा आहे. त्यामुळे या चलनावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि त्याला मान्यता मिळण्याचा मार्ग अजून प्रशस्त होईल.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.