क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
जागतिक बाजारामध्ये पुन्हा एकदा क्रिप्टो करन्सीच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये क्रिप्टो करन्सीच्या किमतीमध्ये 0.04 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीसह क्रिप्टोची मार्केट कॅप 2.36 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली.
नवी दिल्ली : Bitcoin Prices Today जागतिक बाजारामध्ये पुन्हा एकदा क्रिप्टो करन्सीच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये क्रिप्टो करन्सीच्या किमतीमध्ये 0.04 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीसह क्रिप्टोची मार्केट कॅप 2.36 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली. प्रमुख क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉईनचे दर देखील 0.60 टक्क्यांनी घसरले असून, ते 49,893.84 डॉलरपर्यंत खाली आले आहेत. किप्टोमध्ये झालेल्या घसरणीचा गुंतवणुकदारांना कमी अधिक प्रमाणात फटका बसल्याचे पहायला मिळत आहे.
बिटकॉईनच्या दरात घसरण
प्रमुख आणि सर्वात लोकप्रिय किप्टो करन्सी असलेल्या बिटकॉईनच्या दरात 0.60 टक्क्याची घसरण झाली असून, सध्या त्याचे भाव 49,893.84 डॉलर प्रति बिटकॉईनवर पोहोचले आहेत. तर दुसरी महत्त्वाची क्रिप्टो करन्सी असेल्या इथेरियमच्या दरामध्ये मात्र तेजी दिसून येत आहे. इथेरियमच्या किमतीमध्ये 1.47 टक्क्यांची वाढ झाली आहे. इथेरियमचे भाव 3,49,556 रुपये प्रति इथेरियमवर पोहोचले आहेत. कार्डानोच्या किमतीमध्ये देखील 0.09 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. तर पोलका डॉट आणि डॉगमध्ये अनुक्रमे 0.82 आणि 0.43 टक्क्यांची घसरण पहायला मिळत आहे.
गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्थरावर सोन्याच्या किमती सातत्याने बदलत आहेत. मौल्यवान धातुंच्या किमतीमधील अस्थिरतेचा फटका हा गुंतवणूकदारांना बसल्यामुळे अनेकांनी सोन्यामधील आपली गुंतवणूक कमी करत किप्टो करन्सीमध्ये गुंतवली होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोच्या भावामध्ये देखील चढ उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
संबंधित बातम्या
आता आयपीपीबीच्या अॅपवरून देखील करता येणार सिलिंडरची बुकिंग; जाणून घ्या काय आहे फायदा?
Online Fraud : ऑनलाइन व्यवहार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स, नाहीतर सायबर ठग घेतील गैरफायदा
माझे रेशन अॅप लाँच; रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे झाली सोपी, जाणून घ्या काय आहेत फायदे