AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिप्टोत गुंतवणूक… नको रे बाबा…46 हजार गुंतवणूकदारांसोबत झाला स्कॅम, 7775 कोटी रुपये पाण्यात

कमी कालावधीत जास्त रिटर्न्स मिळविण्याच्या आवेशात लोक सध्या मोठ्या संख्येने क्रिप्टोकरंसीमध्ये गुंतवणूक करत आहेत. वेगाने वाढणाऱ्या या प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात घोटाळे उघड होत आहेत. एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून सुमारे 46 हजार गुंतवणूकदारांसोबत क्रिप्टोकरंसी घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.

क्रिप्टोत गुंतवणूक... नको रे बाबा...46 हजार गुंतवणूकदारांसोबत झाला स्कॅम, 7775 कोटी रुपये पाण्यात
CryptocurrencyImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 4:03 PM

सध्या गुंतवणुकीसाठी वेब 3 आणि क्रिप्टोकरंसीच्या (cryptocurrency) पर्यायाची लोकांकडून चाचपणी होत आहे. कमी कालावधीत जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनेक लोक असुक्षीत समजल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरंसीकडे वळताना दिसून येत आहेत. ही संधी हेरुन सायबर गुन्हेगारदेखील आपला मोर्चा त्या दिशेने वळवताना दिसून येत आहेत. एका अभ्यासानुसार, 2021 च्या सुरुवातीपासून या घोटाळ्यांमध्ये लोकांचे 800 कोटी पौंड म्हणजेच सुमारे 7,775 कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एका अहवालानुसार, आतापर्यंत 46 हजार लोकांसोबत क्रिप्टोकरंसी घोटाळा (scam) झाला आहे. गेल्या आठवड्यात फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) ही माहिती दिली आहे.

कसा झाला स्कॅम?

स्कॅममध्ये पैसे गमावलेल्या जवळपास निम्म्या लोकांनी सांगितले, की याची सुरवात जाहिरात किंवा सोशल मीडिया मॅसेजने झाली. गेल्या वर्षी क्रिप्टोकरंसीची क्रेझ खूप जास्त होती. जगभरातील लोक या डिजिटल चलनाकडे आकर्षित झाले. गेल्या वर्षी बिटकॉइन विक्रमी पातळीवर होते आणि कदाचित यामुळेच लोक क्रिप्टोकरंसीकडे आकर्षित झाले होते. अहवालानुसार, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसह टॉप सोशल मीडिया अॅप्सवर क्रिप्टोकरंसी फसवणुकीच्या मुख्यस्थानी आहे.

सोशल मीडियातून सर्वाधिक फसवणूक

सोशल मीडिया फसवणुकीत प्रत्येक 10 डॉलर पैकी 4 डॉलर क्रिप्टोकरंसीमुळे गमावले जातात. FTC नुसार, क्रिप्टोकरंसी संबंधित फसवणुकीमध्ये सरासरी व्यक्तीने 2,600 डॉलर म्हणजे अंदाजे 2,02,000 रुपये गमावले आहेत. बिटकॉइन, Tether आणि Ether मध्ये  सर्वाधिक नुकसान झाले आहे. या वर्षी मेमध्ये, Dogecoin सहसंस्थापक बिली मार्कस यांनी 95 टक्के क्रिप्टोकरंसी प्रोजेक्टचे वर्णन ‘स्कॅम आणि कचरा’ म्हणून केले. FTC ने लोकांना अशा घोटाळेबाजांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

क्रिप्टोकरंसीमध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक सतत लोकांना क्रिप्टोकरंसीमध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला देत आहे. बिटकॉइनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठला त्यावेळी बिटकॉइनची किंमत 69 हजार डॉलर म्हणजे सुमारे 53.6 लाख रुपये होती. त्याचवेळी, बिटकॉइनची किंमत आजच्या दिवसात 23.41 लाख रुपयांवर गेली आहे.

हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर.
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त.
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य.
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ.
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच...
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच....
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.