FD : मुदत ठेवीवर व्याजासोबतच इतक्या लाखांचा विमाही फ्री, या बँकेची ऑफर पाहिलीत का?

FD : आता मुदत ठेवीसोबत ही बँक विमा ही मोफत देत आहे..

FD : मुदत ठेवीवर व्याजासोबतच इतक्या लाखांचा विमाही फ्री, या बँकेची ऑफर पाहिलीत का?
व्याजासह विमा मिळवा मोफतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 4:45 PM

नवी दिल्ली : मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme) ही कमी जोखमीची असल्याने त्यात सर्वसामान्य गुंतवणूक (Investment) करतात. पण स्पर्धेच्या युगात गुंतवणूकदारांना आणखी लाभ देण्यासाठी बँकाही सरसावल्या आहेत. एफडीवर अधिक व्याजदर देण्याची सध्या स्पर्धा लागली आहे. त्यासोबत या बँकेने मोफत विम्याचीही (Free Insurance) ऑफर आणली आहे. त्यामुळे ग्राहकांचा डबल फायदा होणार आहे.

DCB बँकेने ही योजना आणली आहे. बँक मुदत ठेवीवर जादा दराने व्याज तर देतच आहे. पण बँकेने त्यासोबतच तब्बल 10 लाखांपर्यंतचा विमा मोफत देण्याची ऑफर आणली आहे. त्यामुळे व्याजसह मोफत विमा असा ग्राहकांचा दुप्पट फायदा होणार आहे.

DCB बँकेने त्यांची लोकप्रिय डीसीबी सुरक्षा फिक्स्ड डिपॉजिट योजना आणली आहे. या योजनेनुसार, बँक ग्राहकांना 7.1 टक्के परतावा देत आहे. जर ग्राहकाचा आकस्मात मृत्यू ओढावला तर बँक त्याच्या कुटुंबियांना विमा संरक्षणातंर्गत मदत करेल.

हे सुद्धा वाचा

या मुदत ठेव योजनेत दोन खास फीचर देण्यात आले आहेत. या योजनेतंर्गत 3 वर्षांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 7.1 टक्के वार्षिक व्याजदराने परतावा मिळेल. एवढेच नाही तर त्यासोबत 10 लाखांपर्यंतचा विमा मोफत मिळणार आहे.

10 लाख रुपयांच्यावर एफडीवरही 10 लाख रुपयांपर्यंतचेच विमा संरक्षण मिळणार आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की, विमा संरक्षणासाठी ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच त्यासाठी कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्याची गरज राहणार नाही.

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आणखी फायदा मिळणार आहे. योजनेनुसार, सर्वसामान्य ग्राहकांना वार्षिक 7.1 टक्के व्याजदराने परतावा मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.6 टक्के व्याजदराने परतावा देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी ही चांगली ऑफर आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.