उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमक्यांचे सत्र, 400 कोटींच्या खंडणीमागे आहे तरी कोण?

Mukesh Ambani | आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना धमक्यांचे सत्र सुरु आहे. त्यांना तीन ईमेल द्वारे धमकवण्यात आले आहे. त्यांच्याकडे 400 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. पण नेमका हा खटाटोप करतंय तरी कोण? याचे कनेक्शन युरोपात असल्याचे समोर येत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमक्यांचे सत्र, 400 कोटींच्या खंडणीमागे आहे तरी कोण?
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 6:24 PM

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना 27 ऑक्टोबर रोजी 20 कोटींच्या खंडणीसाठी पहिला ई-मेल आला. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी 200 कोटींची मागणी करण्यात आली. तिसरा मेल 30 ऑक्टोबर रोजी आला. यावेळी थेट 400 कोटींची खंडणी मागण्यात आली. फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही आढळली होती. दक्षिण मुंबईतील अंबानींच्या ‘अँटिलिया’ या आलिशान घराजवळ ही कार सापडली होती. त्यात 20 जिलेटिनच्या काड्या आणि एक पत्र सापडले होते. पण मुकेश अंबानी यांना धमकी देणारा ही व्यक्ती आहे तरी कोण?

सर्वात मोठी सुरक्षा

सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्याचा आदेश दिला होता. या फेब्रुवारी महिन्यात याविषयीचा निकाल दिला होता. त्यानुसार मुकेश अंबानी यांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्याचे निर्देश देण्यात आले. ही सुरक्षा व्यवस्था देशातच नाही तर परदेशात पण उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुरक्षेचा खर्च अंबानी कुटुंबिय करतात. त्यासाठी 20-30 लाखांच्या घरात खर्च करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा सखोल तपास

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र आरोपीने आणखी एक धमकीचा ईमेल आरोपीने केल्याने पोलिसाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

बेल्जियम कनेक्शन आले समोर

पोलिसांनी याप्रकरणात कसून तपास केला. ईमेल पाठविणाऱ्याचा आयपी एड्रेस शोधून काढला. बेल्जियम या देशातून हा ईमेल पाठविल्याचे निष्पन्न झाले. पोलीस आता बेल्जियममधील त्या मेल प्रोव्हाईडर कंपनीच्या संपर्कात आहे. त्यामाध्यमातून त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. ही व्यक्ती खरंच एखाद्या गँगस्टर गँगचा सदस्य आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. त्याचे कोणी शॉर्प शूटर भारतात आहेत का? त्यांचे कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.