नवी दिल्ली – प्रमुख क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉईनच्या किमतीमध्ये शुक्रवारी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. बिटकॉईनच्या किमतीमध्ये एक टक्क्याची घसरण झाली असून, त्याच्या किमती 62 हजारांहून 61,946 डॉलर प्रति बिटकॉईनवर पोहोचल्या आहेत. गेल्या महिन्यामध्ये बिटकॉईच्या किमती सातत्याने वाढत होत्या, परिणामी नोव्हेबरच्या सुरुवातीला बिटकॉईनचा दर 67 हजार डॉलरवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर त्याच्या किमतीमध्ये घसरण झाली असून, सध्या बिटकॉईनचे दर 61,946 डॉलर प्रति बिटकॉईन इतका आहे.
बिटकॉईनपाठोपाठ इथेरियम ही दुसरी महत्त्वाची क्रिप्टोकरन्सी मानन्यात येते. इथेरिमच्या दरात देखील 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या इथेरियमचे दर हे 4,531 डॉलरवर पोहोचले आहेत. अन्य क्रिप्टोकरन्सी जसे एक्सआरपी, कार्डानो, अस्वॅप, पोल्काडॉट यांच्या किमतीमध्ये देखील गेल्या 24 तासांमध्ये कमी अधिक प्रमाणात घसरण झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या 24 तासांमध्ये शिबा इनू या क्रिप्टोकरन्सीच्या किमतीमध्ये तब्बल 23 टक्क्यांची घसरण झाली आहे.
दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीलाच क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक देखील कमी होताना दिसत आहे. परिणामी क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक कमी होऊन 288 कोटी डॉलरवर पोहोचली आहे. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक कमी होत असल्याने त्यांच्या किमतीमध्ये देखील कमी झाल्या आहेत. बिटकॉईनच्या किमतीमध्ये गेल्या वर्षभरात चार पटीने वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच बिटकॉईनची किंमत 67,000 डॉलर इतकी होती. मात्र आता त्यात हळूहळू घट होत असून, शुक्रवारी बिटकॉईन 61,946 डॉलरवर पोहोचला आहे.
LPG सबसिडीबाबत केंद्र सरकारची नवी योजना, आता कोणाच्या खात्यात ये णार पैसे?https://t.co/L9wCZsmFQ6 #LPG | #CentraGovernment
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2021
संबंधित बातम्या
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ स्थानकावर डिलक्स टॉयलेट अन् एसी लाऊंजची सुविधा मिळणार
नोटाबंदीच्या पाच वर्षानंतरची अवस्था; रोख व्यवहारात वाढ, नागरिकांकडे चलनाचा आतापर्यंतचा सर्वाधिक साठा
Petrol Price Today: इंधन करकपातीनंतर खनिज तेलाच्या भावात घसरण; पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?