Raksha Bandhan | यंदा देशी मार्केटचं रक्षा बंधन! चीनी राख्यांना धोबीपछाड, देशातंर्गतच 7 हजार कोटींचा राखी व्यवसाय
Raksha Bandhan | यंदाचं रक्षा बंधन विशेष ठरलं. भारतीय व्यापाऱ्यांनी राखीचं चीनी मार्केट पुरतं मोडीत काढलं. पश्चिम बंगालच्या राख्यांनी यंदाचं मार्केट सजलं होतं.
Raksha Bandhan | कोरोनाचे (Covid-19) मळभ कमी झाल्यानंतर यंदा रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. महागाई असतानाही खरेदीदारांच्या उत्साहाने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर चमक आली. देशभरात सुमारे 7 हजार कोटींचा राखीचा व्यवसाय (Rakhi Business) झाला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या वर्षी राख्यांची 3,500 ते 4,500 कोटी रुपयांची उलाढाल (Turnover) झाली होती. मात्र, यंदा राख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी महागल्या आहेत. दरात वाढ झाली असली तरी यावेळी 40 टक्के राख्यांची अधिक विक्री झाली आहे. पण व्यापाऱ्यांच्या मते त्यांचा नफा घटला आहे. यंदाचं रक्षा बंधन विशेष ठरलं. भारतीय व्यापाऱ्यांनी राखीचं चीनी मार्केट(China Market) पुरतं मोडीत काढलं. पश्चिम बंगालच्या राख्यांनी यंदाचं मार्केट सजलं होतं. यंदा चीनी मार्केट दणक्यात आपटल्याने भारतीय बाजारपेठेला आणि राखी उद्योगातील सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय राख्यांची मागणी
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) चे मेट्रोपॉलिटन मुंबई प्रांताचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी बिझनेस स्टँडर्डला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, चीनी राख्यांना यंदा बिलकूल उठाव नव्हता. भारतीय ग्राहकांनीही चिनी राख्यांकडे यंदा पाठ फिरवली. त्यामुळे चीन मार्केट मोडीत निघाले. देशभरातील बाजारपेठांमध्ये फक्त भारतीय राखीलाच जास्त मागणी होती. गेल्या वर्षी राख्यांची 3,500 ते 4,500 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा देशभरात सुमारे 7 हजार कोटींचा राखीचा व्यवसाय (Rakhi Business) झाला. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत राख्या 20 ते 25 टक्क्यांनी महागल्या आहेत. दरात वाढ झाली असली तरी यावेळी 40 टक्के राख्यांची अधिक विक्री झाली आहे. मात्र व्यापाऱ्यांना कमी प्रमाणात नफा मिळाल्याचा दावा त्यांनी केला. यंदा खर्चाचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
लोकांची रुची बदलली
CAT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी चीनी राख्यांकडील ओढा कमी झाल्याची माहिती दिली. चीनविषयीच्या भावनेचा लोकांनी व्यवहारातही वापर केल्याचे त्यांनी सांगितले. लाइट, म्युझिक, स्टोन आणि मोत्याच्या राख्या चीनमधून येत होत्या, मात्र आता या सर्व राख्या देशातच बनवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वीपर्यंत देशात 70 टक्के चिनी राख्यांची विक्री होत होती. यावेळी व्यापाऱ्यांनी चीनमधून राखी मागवली नाही. देशातील एकूण व्यवसायात बंगालचा वाटा 50 ते 60 टक्के आहे. त्यानंतर गुजरात, मुंबई, दिल्ली, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर राख्या बनवल्या जातात.
ही बातमी पण वाचा