Momos Street Food : मोमोजवाल्याची कमाई ऐकून तुम्ही म्हणाल…आता हा बिझनेस मीच करणार
Momos Street Food : मोमोजवाल्याच्या कमाईचा आकडा ऐकून तुम्ही म्हणाल नोकरीपेक्षा हाच व्यवसाय Best. पण फक्त कमाईचा आकडा वाचून भारावून जाऊ नका. इतरही अन्य गोष्टी लक्षात घ्या.
नवी दिल्ली : सध्या स्ट्रीट फूडमध्ये मोमोजची क्रेझ आहे. मुंबईत रस्त्यावर ठिकठिकाणी मोमोजचे स्टॉल पहायला मिळतात. या मोमोजच्या स्टॉलभोवती संध्याकाळच्यावेळी खवय्यांची गर्दी दिसते. मुंबईप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा मोमोज खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. दिल्लीत सुद्धा गल्लीबोळ आणि रस्ते स्ट्रीट फूडसाठी ओळखले जातात. इथे सुद्धा मोमोजची क्रेझ प्रचंड आहे. दिल्लीतल्या मोमोजच कौतुक भरपूर होतं. दिल्लीतला एक मोमोजवाला सरासरी किती कमाई करतो, याचा तुम्ही विचार केलाय का?
दिल्लीत मागच्या 21 वर्षांपासून मोमोजच दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराने सांगितलं की, त्याच्याकडे दिवसाला सरासरी 300 ते 400 कस्टमर येतात. प्रत्येक प्लेटची किंमत 40 ते 60 रुपये आहे. याची सरासरी काढली, तर 50 रुपये होतात.
मोमोज विकून महिन्याची कमाई किती?
दुकानदाराने सांगितलं की, प्रत्येक प्लेटमागे त्याला 10 रुपये मिळतात. या दुकानदाराकडे रोज सरासरी 350 ग्राहक येत असतील, तर त्याची रोजची कमाई 3500 रुपये आहे. दुकानदाराने सांगितलं की, तो महिन्याभरात त्याच दुकान कधीही बंद करत नाही. 3500 ला 30 ने गुणलं तर ही रक्कम 1 लाख 5 हजार रुपये होते. कमाईच नाही, इतर घटकही महत्वाचे
दुकानदाराचा अंदाज बरोबर असेल, तर चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या सरासरी कर्मचाऱ्याच्या तुलनेत ही जास्त कमाई आहे. मोमोज विकून जास्त पैसा मिळतो, एवढाच भाग नाहीय. मोमोजची टेस्टही तितकीच महत्वाची आहे. त्याशिवाय लोकेशन सुद्धा महत्वाच आहे. कारण लोकेशन चांगलं असेल, गर्दीच ठिकाण असेल, तर फायदा जास्त असं गणित आहे.