Best smartphones for delivery riders | डिलिव्हरी रायडर्ससाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम स्मार्टफोन्स, शाओमीला सर्वाधिक पसंती

Best smartphones for delivery riders | बोर्झो या ग्लोबल डिलिव्हरी सर्विस प्रदान करणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार शाओमी, ऑप्पो आणि व्हिवो हे ब्रँड्स डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील सर्वात प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड्स ठरले आहेत.

Best smartphones for delivery riders | डिलिव्हरी रायडर्ससाठी 'हे' आहेत सर्वोत्तम स्मार्टफोन्स, शाओमीला सर्वाधिक पसंती
सर्वोत्तम स्मार्टफोन्स कोणते?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:15 PM

Best smartphones for delivery riders | आजचा जमाना डिजीटलचा (Digital Age) आहे. कोणतेही पेमेंट (Payment)असो, ते पटकन ऑनलाइन करण्याकडे आपला कल असतो. अनेक डिलिव्हरी एजंट्स किंवा कर्मचारीही ऑनलाइन व्यवहारांना पसंती देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे डिलिव्हरी करणारे कर्मचारी (delivery riders )असा कोणता स्मार्टफोन वापरतात, ज्यामुळे त्यांची प्रक्रिया जलद होते ? अत्यत जलद गतीने बारकोड्स स्कॅन (Barcode Scan) करणे, स्क्रीन बदलणए आणि पटकन डिलीव्हरी पूर्ण करणे, याकडे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा कल असतो. जास्तीत जास्त डिलिव्हरी करून टार्गेट पूर्ण करणे हे त्यांचे लक्ष्य असते. बोर्झो(Borzo-WeFast) या कंपनी मार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामधून या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. बोर्झोच्या अहवालानुसार, डिलिव्हरी कर्मचारी शाओमी, ऑप्पो आणि व्हिवो या कंपन्यांचे स्मार्टफोन्सचा अधिकाधिक वापर करत असल्याचे दिसून आले आहे.

तंत्रज्ञानामुळे स्वत:च्या मनाप्रमाणे काम करणाऱ्या लोकांना एक मोठे माध्यम मिळाले आहे. त्याचमुळे गेल्या काही वर्षांत अनेक लोकांनी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. विविध ईकॉमर्स कंपन्या सुरू झाल्या, तसेच खाद्य आणि वाहतूक कामासाठी अनेक संधी उपलब्ध असल्याने डिलिव्हरीचे काम करू इच्छित लोकांसाठी कामाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. डिलिव्हरी कर्मचारी म्हणून काम करण्यासाठी एक चांगला मोबाईल, दुचाकी अथवा तीन चाकी गाडी आणि साध्या सोप्प्या कागदपत्रांची पूर्तता करणे एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे शहरात ‘टेक-एनेबल’ अॅप्ससाठी कुरियर आणि डिलिव्हरीची कामे करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या ‘टेक-एनेबल प्लॅटफॉर्म अॅप्स’सह सुरळीतपणे काम करण्यासाठी एका चांगल्या स्मार्टफोनची आवश्यकता असते. ज्या स्मार्टफोनमध्ये पुरेशा प्रमाणात रॅम व जास्त स्टोरेज असेल, असे फोन या कामासाठी उपयोगी ठरतात. बोर्झो कंपनीने 18 हजारांहून अधिक डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या डेटा अभ्यासला. शाओमी, ऑप्पो आणि व्हिवो हे भारतामधील ह्या वर्षातले सर्वात आवडीचे ब्रँड्स असल्याचे त्यातून दिसून आले.

भारतातील डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जरी या तिनही कंपन्यांच्या फोन्सना सर्वाधिक पसंती दिली असली तरीही शाओमीचे स्मार्टफोन्स या शर्यतीत आघाडीवर आहेत. डिलिव्हरीचे काम करणाऱ्या लोकांचा हेच फोन घेण्याकडे वाढता कल दिसून आले. स्वस्त आणि परवडणाऱ्या किंमतीत ,अधिकाधिक फीचर्स या फोनमधून मिळतात, म्हणून याच ब्रँड्सना लोक जास्त पसंती देतात. बोर्झोच्या अहवालानुसार, देशातील डिलिव्हरी कर्मचारी 3 जीबी किंवा जास्तीत जास्त 8 जीबी रॅम असणारा, 7 ते 17 हजार रुपये किंमतीतील स्वस्त मोबाईल फोन घेण्यावर भर देतात. वेगवेगळे रंग आणि फीचर्स असणारा शाओमीचा रेडमी नोट 9 हा सर्वात प्रसिद्ध फोन ठरला आहे .

हे सुद्धा वाचा

भारतीय डिलिव्हरी कर्मचाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असणारे ह्या वर्षातील सर्वोत्तम 10 फोन :

1) शाओमी रेडमी 9 2) शाओमी रेडमी नोट 10एस 3) विवो व्हाय21 4) शाओमी रेडमी नोट 7 प्रो 5) शाओमी रेडमी नोट 8 प्रो 6) शाओमी रेडमी 9 पॉवर 7.) शाओमी रेडमी 9ए 8) रेडमी नोट 5 प्रो 9) ओप्पो ए54 10.) रेडमी नोट 8

तर गेल्या वर्षी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असणारे सर्वोत्तम 10 फोन होते :

1) शाओमी रेडमी नोट 5 प्रो 2) शाओमी रेडमी नोट 7 प्रो 3) शाओमी रेडमी नोट 8 प्रो 4) शाओमी रेडमी नोट 9 प्रो 5) विवो 1907 6) ओप्पो ए53 7) विवो 1901 8) सॅमसंग गॅलेक्सी ए50 9) सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्राईम 10)विवो व्हाय20

शाओमी कंपनीच्या स्मार्टफोन्सने यंदा सुद्धा पहिल्या क्रमाक कायम ठेवला आहे, तर सॅमसंग स्मार्टफोन्सला असलेली पसंती मात्र पूर्णपणे कमी झाली आहे.

बोर्झो कंपनीबद्दल माहिती

बोर्झो ही कंपनी ग्लोबल डिलिव्हरी सर्विस प्रदान करते यामुळे विविध कंपन्यांना शहरभर आपली उत्पादने पोचवण्यात मदत होते. ऑन डिमांड डिलिव्हरी पासून ते त्याच दिवशी केली जाणारी डिलिव्हरी असे विविध डिलिव्हरी प्रकार कोणत्याही मार्गाने, कोणत्याही वाहनाने पोहोचवण्यात बोर्झोचा हातखंडा आहे. शिवाय वजन कितीही असो, आकार कितीही मोठा असो अत्यंत योग्य दरात डिलिव्हरी सेवा बोर्झो मार्फत प्रदान केली जाते. त्यांची यंत्रणा इतकी सक्षम आणि सुरळीत काम करते की , ठिकाणाची पूर्ण माहिती, पॅकेज मध्ये समाविष्ट असलेली वस्तू आणि इतर अन्य गोष्टी विचारात घेऊन एकदम जलद गतीने त्याच दिवशी डिलिव्हरी सहज होते. सध्या बोर्झोची सेवा आशिया आणि लॅटीन अमेरिकेमधील 9 देशांत विस्तारलेली असून जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त ग्राहक त्यांच्या सेवेचा लाभ घेतात. ज्यामध्ये व्यक्तीपासून मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र बोर्झोची अधिकाधिक सेवा लघु-मध्यम व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर वापरतात. बोर्झो मार्फत दर महिन्याला 20 लाख कुरीयर्सच्या माध्यमातून 20 लाख डिलिव्हरीज पूर्ण केल्या जातात.

हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.