inflation effect : इंधन दरवाढीचा परिणाम, पेट्रोल, डिझेलच्या मागणीत घट
भारतामध्ये एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात इंधनाच्या (Fuel) विक्रीमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. इंधनाच्या मागणीमध्ये घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरात झालेली वाढ हे माणण्यात येत आहे.
भारतामध्ये एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात इंधनाच्या (Fuel) विक्रीमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. इंधनाच्या मागणीमध्ये घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरात झालेली वाढ हे माणण्यात येत आहे. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात सातत्याने इंधनाच्या दरात वाढ झाली. या काळात पेट्रोल, आणि डिझेलचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढले. याचा फटका सर्वासामान्यां बसल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलच्या मागणीत घट झाल्याची माहिती प्राथमिक औद्यागिक डेटामधून समोर आली आहे. या आकडेवारीनुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्याच्या तुलनेत एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये पेट्रोलच्या मागणीत दहा टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. तर डिझेलच्या मागणीमध्ये 15.6 टक्क्यांची घसरण झाली आहे. एतकेच नाही तर सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी गॅसची देखील मागणी घटली असून, त्यांच्यामध्ये सरासरी दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.
137 दिवसांनंतर वाढवण्यात आले दर
केंद्र सरकारने चार नोव्हेंबर 2021 ला एक्साईज ड्यूटीमध्ये कपात केल्याने पेट्रोल दर प्रति लिटर पाच रुपयांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर दहा रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर तब्बल137 दिवस इंधनाचे दर स्थिर होते, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. अखेर 22 मार्च 2022 रोजी पेट्रोल,डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. तेव्हापासून ते सहा एप्रिलपर्यंत सातत्याने इंधनाच्या दरात वाढ सुरूच होती. या काळात इंधनाचे दर लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक महागल्याने महागाईचा भडका उडाला. याचा थेट परिणाम हा इंधन खरेदीवर झाला असून, इंधनाच्या खरेदीमध्ये घसरण झाली आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीतही घसरण
केवळ पेट्रोल, डिझेलच नाही, तर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीध्ये देखील घट झाली आहे. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यता आला. या अहवालानुसार एफएमसीजी वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण घटले आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहक वस्तूंची खरेदी कमी करत असल्याचे समोर आले आहे. जीवनावश्यक वस्तूींची खरेदी कमी करण्याचे प्रमाणा तमिळनाडू, आध्र प्रदेश, तेलंगना आणि कर्नाटक अशा दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राला देखील वाढत्या महागाईचा फटका बसला आहे.
संबंधित बातम्या
jet fuel prices hike: विमान इंधनाच्या दरात वाढ; प्रवास महागण्याची शक्यता
Sri Lanka financial crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; शेअर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय