AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पासपोर्टसाठी डिझाईन करा लोगो आणि टॅगलाईन, सरकार देईल 25 हजारांचं बक्षिस

तुम्हीही पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी लोगो डिझाइन करू करून टॅगलाइनही सुचवू शकता. यासाठी 21 जानेवारी ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे.

पासपोर्टसाठी डिझाईन करा लोगो आणि टॅगलाईन, सरकार देईल 25 हजारांचं बक्षिस
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 9:30 PM

नवी दिल्ली : भारत सरकारचं परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी (Passport Seva Program) लोगो (Logo) आणि टॅगलाइन (Tagline) शोधत आहे. यासाठी मंत्रालयाच्या पासपोर्ट सेवा विभागानं खास स्पर्धा आणली आहे. याद्वारे तुम्हीही पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी लोगो डिझाइन करू करून टॅगलाइनही सुचवू शकता. यासाठी 21 जानेवारी ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. (design logo and tagline for passport seva program and get 25 thousand cash from government)

मिळणार 25 हजार रुपये बक्षीस

तुम्हालाही जर लोगो डिझाइन करण्याची कला अवगत असेल तर तुम्ही स्वत: पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी टॅगलाइन आणि लोगो डिझाइन करू शकता. खरंतर, राष्ट्रीय सेवेसाठी तुम्ही डिझाइन केलेला लोगो आणि टॅगलाइन निवडली गेली तर हा एक मोठा सन्मान आहे. इतकंच नाही तर याचे तुम्हाला रोख बक्षीसही दिलं जाणार आहे. सरकारी वेबसाइट http://mygov.in/ नुसार सर्वोत्कृष्ट डिझाइनरला 25,000 रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. यासाठी अर्ज भरण्याची शेवटती तारीख 21 जानेवारी आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी काय आहेत नियम?

सरकारच्या या स्पर्धेमध्ये कोणीही भाग घेऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परदेशात राहणारे भारतीयसुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी जर तुम्ही लोगो तयार केला असेल तर त्यासाठी www.mygov.in या सरकारच्या वेबसाइटवर लॉगईन करा. एकावेळी एकच व्यक्त आपलं नाव नोंदवू शकतो. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर mygov Blog या वेबसाइटवर विजेत्या नावाची घोषणा केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, 4 आठवड्यांमध्ये यासंबंधी निकाल जाहीर केला जाईल.

कसा असला पाहिजे लोगो?

1. तुम्ही डिझाइन केलेला लोगो ऑरिजनल असला पाहिजे.

2. तुम्ही कॉपीराइट कायदा 1957 चं उल्लंघन करता कामा नये.

3. हा लोगो फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवरच डिझाइन केला गेला पाहिजे.

4. या लोगोमध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा चेथावणीखोर नसावं

5. टॅगलाइनमध्ये इंग्रजी किंवा हिंदी शब्द वापरले जाऊ शकतात.

लोगो पाठवताना ‘या’ गोष्टी लक्षात असुद्या

1. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लोगो एआय (AI), जेपीईजी (JPEG), पीएनजी (PNG), पीएसडी (PSD) किंवा पीडीएफ (PDF) स्वरूपात पाठवू शकता.

2. लोगो हा वेबसाइट, मोबाइल अॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मसाठी योग्य असला पाहिजे.

3. लोगो हा जास्त रिझोल्यूशनमध्ये असणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच तो कमीतकमी 300 Dpi असावा. (design logo and tagline for passport seva program and get 25 thousand cash from government)

संबंधित बातम्या – 

ITR date extended latest News | रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ, कन्फ्युजन नको, योग्य तारीख जाणून घ्या

पॅनकार्ड फक्त ‘या’ दोन कंपन्यांकडूनच तयार करा; अन्यथा…

LIC पॉलिसीवर पर्सनल लोन कसं मिळू शकतं? सोप्या टिप्स

(design logo and tagline for passport seva program and get 25 thousand cash from government)

दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd.
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय.
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?.
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह.