Share Market : आर्थिक स्वातंत्र्याची उगवली का पहाट! शेअर बाजाराने दिला का परतावा जोरदार

Share Market : कोरोना काळात हौसे-नवसे-गवसे सगळ्यांनीच शेअर बाजारात नशीब आजमावले. काहींनी प्रवास सुरु ठेवला. त्यांना गेल्या एका वर्षांत शेअर बाजाराने परतावा दिला की नाही? या काळात किती वधारला शेअर बाजार

Share Market : आर्थिक स्वातंत्र्याची उगवली का पहाट! शेअर बाजाराने दिला का परतावा जोरदार
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 8:55 AM

नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 2023 : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. गेल्या 76 वर्षांत देशाने अनेक क्षेत्रात डोळे दिपवणारी कामगिरी केली आहे. अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार (Indian Economy and Share Market) मोठ्या गतीने पुढे झेपावत आहे. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक महासत्तांच्या पंक्तीत येऊन बसली आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त तेजी दाखवली आहे. जगातील अर्थतज्ज्ञांची गणितं भारतीय अर्थव्यवस्थेने चौपट केली आहे. त्यांची आकडेमोड फेल ठरली आहे. गेल्या स्वातंत्र्य दिनापासून (Independence Day) ते आतापर्यंत शेअर बाजाराने किती घौडदौड केली, याची समिक्षा आणि उत्सुकता अनेकांना आहे. बाजारात गुंतवणूकदारांच्या पदरात काही पडले की नाही, याची गोळाबेरीज काहींनी केली आहे. किती दिला शेअर बाजाराने परतावा?

शेअर बाजाराची आगेकूच

गेल्या स्वातंत्र्य दिनापासून निफ्टीने 9.6% उच्चांक गाठला. या कालावधीत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जवळपास 10 टक्के परतावा दिला. बाजाराने ब्रॉडर मार्केटमध्ये पण जोरदार कामगिरी बजावली. काही शेअर्सने तर गेल्या तीन वर्षांत, दोन वर्षांत मोठी झेप घेतली. लाभांश, परताव्याचा रुपात गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला. काही शेअर्सनी निराशा पण केली.

हे सुद्धा वाचा

या सेक्टर्सने दिला तगडा परतावा

15 ऑगस्ट 2022 रोजीपासून आतापर्यंत शेअर बाजारात अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले. यामध्ये सर्वाधिक परतावा स्मॉल कॅप शेअरने दिला. निफ्टी स्मॉल-कॅप 23.68%, निफ्टी मिड-कॅप 22.46% यांनी परतावा देण्यात बाजी मारली. या शेअरमध्ये गुंतवणूक अनेकांना फायद्याची ठरली. त्यांना चांगला परतावा मिळाला.

सेक्टरनूसार परतावा

सेक्टरनुसार शेअर्सनी परतावा दिला. त्यात तफावत आहे. निफ्टी एफएमसीजीमध्ये गुंतवणूकदारांना सर्वाधिक 21.23% टक्के परतावा मिळाला. निफ्टी रिअल्टीमध्ये (19.03%), निफ्टी फार्मा (18.75%) , निफ्टी ऑटो (18.49%) आणि निफ्टी बँक मध्ये 12.85% वाढ दिसून आली. निफ्टी आयटी सेक्टर या एका वर्षांत मोठा परतावा देऊ शकले नाही. या सेक्टरने 3.52% रिटर्न दिला.

अमेरिकन बाजाराचा प्रभाव

अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणामुळे महागाईत आटोक्यात आली. वाढीव व्याज दराने महागाईचा भडका कमी झाला. त्यानंतर व्याजदरात नरमाईचे धोरण आले. त्याचा जगावर अनुकूल परिणाम झाला. अमेरिकन शेअर बाजारावर ही त्याचा चांगला परिणाम दिसून आला. या सर्व घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून आली. परदेशी गुंतवणूकदारांनी मध्यंतरी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यांनी चीनकडील पैसा भारतीय स्टॉक मार्केटमध्ये लावला. त्यामुळे शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली.

तज्ज्ञांचे मत काय

जियोजित फायनेन्शिअल सर्व्हिसेजचे डॉ. व्ही. के विजयकुमार यांच्या मते, गुंतवणूकदारांना पुढील वर्षी जवळपास 15% रिटर्न मिळू शकतो. त्यांच्या अंदाजाप्रमाणे हा परतावा 2024 मध्ये सुरुवातीलाच येईल. अनेक सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.