Mithun Chakraborty : कधी फुटपाथवर जागून काढल्या रात्री, आज इतकी आहे मिथुन चक्रवर्ती यांची संपत्ती

Mithun Chakraborty : डिस्को डान्सरने भारतीय तरुणाईला वेड लावले आहे. त्यांच्या अभिनयाने अनेक चित्रपटांना हिट केले. पण हे यश मिथुनदांना सहज मिळाले नाही. कधी काळी त्यांना फुटपाथावर रात्री जागून काढाव्या लागल्या. पण आज त्यांची इतकी आहे संपत्ती

Mithun Chakraborty : कधी फुटपाथवर जागून काढल्या रात्री, आज इतकी आहे मिथुन चक्रवर्ती यांची संपत्ती
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 6:16 PM

नवी दिल्ली : लोकप्रिय अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा आज 73 वा जन्मदिवस (Mithun Chakraborty Birthday) आहे. 16 जून 1950 रोजी कोलकत्ता येथे मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म झाला होता. त्यांचे जन्म नाव खरं तर गौरांग आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. आजही ते रुपेरी पडद्यावर सक्रिय आहेत. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नव्हता. कधी काळी त्यांना फुटपाथावर रात्री जागून काढाव्या लागल्या. सिनेमा ऐवजी त्यांनी हॉटेल व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. त्यांचा हॉटेल व्यवसायाच मोठा विस्तार आहे. आज ते अफाट संपत्तीचे धनी आहेत.

इतकी आहे संपत्ती अभिनयासोबत मिथुन चक्रवर्ती यांनी व्यवसायातही नशीब काढलं आहे. उटीत त्यांचं खूप मोठं हॉटेल आहे. चित्रपट, व्यवसाय यातून मिथुनदा यांनी 347 कोटी रुपयांची अफाट माया (Mithun Chakraborty Net Worth) जमावली आहे. कधीकाळी अत्यंत हालखीची परिस्थिती काढलेल्या मिथुनदांना आजही गरिबीचे आणि मुंबईतील फुटपाथवर जागून काढलेल्या रात्री आठवतात.

असा आहे पसारा मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे बंगला, महागड्या कार तर आहेतच. पण त्यांच्याकडे कुत्रे पण आहेत. त्यांच्याकडे एकूण 116 कुत्रे आहेत. मुंबईतील बंगल्यात त्यांच्याकडे 38 कुत्रे आहेत. तर उटी येथील बंगल्यात 78 कुत्रे आहेत. मिथुनदांकडे मुंबई, उटी, कोलकत्ता या शहरात अनेक मालमत्ता आहे. मुंबईत त्यांच्याकडे दोन बंगले आहेत. एक बांद्रामध्ये तर दुसरा बंगला हा मड आयलँडमध्ये आहे. उटीमध्ये मिथुनदा यांचा एक फार्म हाऊस आहे. मसिनागुडी येथे त्यांच्याकडे 16 कॉटेज आहे. तर म्हैसूर येथे 18 कॉटेज आणि अनेक रेस्टॉरंट आहेत.

हे सुद्धा वाचा

सिनेमातून नाही तर व्यवसायातून कमाई हॉटेल व्यवसायातून मिथुन चक्रवर्ती खूप पैसा कमवतात. त्यांचा हा व्यवसाय फार जुना आहे. तसेच त्याचा विस्तारपण मोठा आहे. टीव्ही शोमधूनही त्यांनी चांगली कमाई केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी आतापर्यंत 350 चित्रपटातून अभिनय केला आहे. 1989 मध्ये तर त्यांनी रेकॉर्ड केला होता. एकाच वर्षात त्यांचे 17 सिनेमा प्रदर्शित झाले होते.

आलिशान कारचे कलेक्शन मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज, फोक्सवॅगन, फोर्ड, टोयोटा फॉर्च्युनर अशा महागड्या कार आहेत. ते मदत करण्यात ही तत्पर आहेत.

नक्षलांच्या संपर्कात दोन भावांमध्ये मिथुन चक्रर्ती हे लहान आहेत. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भौतिकशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर ते नक्षलवादाकडे आकर्षित झाले. ते एका नक्षलवादी गटात सहभागी झाले. पण भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी हा मार्ग सोडून दिला. पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण पूर्ण केले. मोठ्या संघर्षानंतर मुंबईत त्यांना ‘मृगया’ चित्रपटात ब्रेक मिळाला. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.