AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कौटुंबिक विवाद उद्योगाच्या मुळावर! गौतम सिंघानिया यांना इतक्या कोटींचा फटका

Gautam Singhania | रेमंडचे चेअरमन गौतम सिंघानिया यांच्या पत्नीच्या आयुष्यात वादळं सुरु आहेत. त्यांनी दिवाळीच्या काळात 13 नोव्हेंबर रोजी पत्नी नवाज मोदी सिंघानिया हिच्याशी काडीमोड घेण्याचे जगजाहीर केले. 32 वर्षांचा संसार संपुष्टात आल्याचे ते म्हणाले. या सर्व घडामोडींचा परिणाम त्यांच्या रेमंड या उद्योगसमूहावर पण होत आहे.

कौटुंबिक विवाद उद्योगाच्या मुळावर! गौतम सिंघानिया यांना इतक्या कोटींचा फटका
| Updated on: Nov 24, 2023 | 10:28 AM
Share

नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : रेमंड समूहाचे चेअरमन गौतम सिंघानिया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. पेल्यातील वादळाने त्यांच्या साम्राज्याला हादरे बसत आहे. दिवाळीच्या धुमधडाक्यात त्यांच्या वैवाहिक आयुष्यात भूकंप आला. त्यांनी पत्नी नवाज मोदी सिघांनिया हिच्याशी काडीमोड घेण्याचे सोशल मीडियावर जगजाहीर केले. 32 वर्षांतील त्यांचा प्रवास थांबविल्याचे ते म्हणाले. त्यानंतर या वादाला अनेक वळणं मिळाली. प्रत्येक वळणावर वादाची फोडणी बसली. घटस्फोट, पोटगी, मारहाणीचा आरोप असा प्रवास सुरुच आहे. त्यांच्या या वादाचे पडसाद Raymond समूहात दिसत आहे. या 10 दिवसातच कंपनीचे मार्केट कॅप 1500 कोटी रुपयांनी घसरले आहे.

रेमंड लिमिटेडला फटका

गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यात घटस्फोटामुळे वाद सुरु आहे. त्याचा परिणाम रेमंड समूहावर दिसत आहे. समूहाचे शेअरमध्ये पडझड झाली आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअर 1667.20 रुपयांवर बंद झाला. तर आज, शुक्रवारी सकाळी 10:20 वाजता हा शेअर 1673.30 रुपयांवर होता. Raymond Ltd Share मध्ये घसरण झाल्याने कंपनीचे मूल्य पण घटले आहे. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 1500 कोटी रुपयांनी घटले आहे. ते काल 11009 कोटी रुपये उरले.

हे प्रकरण तरी काय

दिवाळीत रेमंड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. पत्नी नवाज मोदी सिंघानिया हिच्यासोबतचा 32 वर्षांचा सुखी संसार संपुष्टात आल्याचे त्यांनी जगजाहीर केले.   पत्नीपासून फारकतीचा निर्णय त्यांनी घेतला. पत्नीने पण त्यांच्यावर मारहाणीचा आरोप केला. रेमंड समूहाच्या दिवाळीच्या पार्टीत आमंत्रण देण्यात आले, पण त्यांना प्रवेश देण्यात आला नाही असा आरोप त्यांनी एका व्हिडिओत केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत त्या आंदोलन करताना दिसून आल्या.

मोठ्या पोटगीची मागणी

एका वृत्तानुसार, नवाज यांनी पतीच्या एकूण 11,660 कोटींच्या संपत्तीत 75% टक्के वाटा मागितला आहे. ही रक्कम 8745 कोटी रुपये होते. यामध्ये दोन मुली निहारिका आणि निसा आणि नवाज यांचा वाटा असेल. गौतम सिंघानिया यांनी या पोटगीला सहमती दिल्याचे समोर येत आहे. पण कुटुंबातील सदस्यांना संपत्तीत वारसा हक्काने वाटा मिळेल, अशी अट त्यांनी ठेवली आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.