फार्मा कंपनीतील कर्मचाऱ्यांना लॉटरी! Tata SUV मिळाली दिवाळी भेट

Diwali Gift | MITS हेल्थकेअरच्या वेबसाईटनुसार, या कंपनीची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली आहे. एम के भाटिया यांनी ही कंपनी सुरु केली आहे. कंपनी फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सची निर्मिती करते. ही कंपनी फार्मा प्रोडक्ट्सच्या वितरणात पण अग्रभागी आहे. या कंपनी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून Tata SUV दिल्याने चर्चा होत आहे.

फार्मा कंपनीतील कर्मचाऱ्यांना लॉटरी! Tata SUV मिळाली दिवाळी भेट
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 6:58 PM

नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : MITS हेल्थकेअर ही कंपनी सध्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बंपर दिवाळी गिफ्ट दिले आहे. या कंपनीने 50 कर्मचाऱ्यांना टाटा एसयुव्ही भेट दिली आहे. वृत्त संस्था ANI ने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, कंपनी यापूर्वीच स्टार कर्मचाऱ्यांना टाटा पंच कॉम्पक्टची भेट दिली आहे. तर लवकरच 38 कर्मचाऱ्यांना कंपनी दिवाळीचे गिफ्ट म्हणून टाटाची एसयुव्ही कार देणार आहे. ही कंपनी हरियाणातील आहे. तिची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली आहे. एम. के. भाटिया हे या कंपनीचे मालक आहे. या कर्मचाऱ्यांची मेहनत, कष्ट आणि कंपनीप्रती असलेली इनामदारी हेच खरं भांडवल असल्याचे मालकाचं म्हणणं आहे.

अनेक वर्षांपासून कंपनीसोबत

भाटिया यांच्या मते, हे कर्मचारी अनेक वर्षांपासून कंपनीसोबत जोडलेले आहेत. काही तर स्थापनेपासून याच कंपनीत आहे. त्यांनी कंपनीच्या यशात मोलाचा सहभाग दिला आहे. त्यांच्या कर्तृत्वावर हे कर्मचारी मोठ्या हुद्दावर पोहचले आहेत. त्यांनी उत्पादन विक्रीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

12 कर्मचाऱ्यांना चावी, 38 जणांना लवकरच लॉटरी

सध्या 12 कर्मचाऱ्यांना नवीन एसयुव्हीची चावी देण्यात आली आहे. तर उर्वरीत 38 जणांना लवकरच लॉटरी लागणार आहे. स्टार कर्मचाऱ्यांना अगोदर एसयुव्ही देण्यात आली आहे. तर इतर स्टार कर्मचाऱ्यांना लवकरच हे गिफ्ट देण्यात येणार आहे. भाटिया हे कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रेरित करतात. ते स्वतःही कर्मचाऱ्यांसह झटतात. त्यामुळे कर्मचारी पण काम करण्यात मागे नाहीत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे कंपनीने अवघ्या काही वर्षांत मोठा पल्ला गाठल्याचे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या कंपनीतील प्रत्येक कर्मचारी सेलिब्रेटी आहे, असे त्यांचे वाक्य कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रेरित करते.

कर्मचाऱ्यांना सुखद धक्का

कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यात येणार याची कुणकुण सुद्धा नव्हती. या कंपनीने कर्मचाऱ्यांना हा आश्चर्याचा धक्का दिला. यातील ज्या कर्मचाऱ्यांना कार देण्यात आली अथवा आता देण्यात येणार आहे, त्यातील काहींना कार चालविता पण येत नाही. त्यांनी कधी विचारच केला नव्हता की त्यांना कंपनी इतके बंपर गिफ्ट देईल. ज्यावेळी व्यवस्थापनाने नाव जाहिर केले, त्यावेळी काहींना आश्रू अनावर झाले. त्यांना विश्वासच बसला नाही. मालकांचे अगोदरच इतके प्रेम असताना हा नवीन गिफ्टमुळे कर्मचाऱ्यांना भावना अनावर झाल्या.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.