लक्ष्मी पुजनाच्या दिवशी होणार कमाई, मुहूर्त ट्रेडिंग आहे तरी काय?

Diwali Muhurat Trading 2023 | दिवाळीच्या काळात शेअर बाजारात सुट्टीचे सत्र असले तरी एक तासासाठी खास सत्र आयोजित केले जाते. दिवाळीला शेअर बाजारातून कमाई करता येते. अनेक जण दरवर्षी हा धन धना धन मुहूर्त गाठतात. या दिवशी दिवाळीचा मुहूर्त ट्रेडिंग होईल. या दिवशी दिवसभर ट्रेडिंग होणार नाही. पण केवळ या एक तासात तुम्हाला कमाईची संधी साधता येईल.

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी होणार कमाई, मुहूर्त ट्रेडिंग आहे तरी काय?
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 9:58 AM

नवी दिल्ली | 10 नोव्हेंबर 2023 : शेअर बाजारात गुंतवणूकदारांना कमाईचा मुहूर्त गाठता येईल. NSE आणि BSE दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी एक तासासाठी उघडतात. हा एक तास शुभ मानण्यात येतो. दिवाळीच्या काळात शेअर बाजारात पण सुट्टीचे सत्र असते. पण गुंतवणूकदारांना एक तासासाठी लक्ष्मी दर्शन होते. दिवाळीत एक तासाच्या ट्रेडिंगची परंपरा अनेक दिवसांपासून सुरु आहे. या दिवशी शेअर बाजारात ट्रेडिंग करणे हे शुभ मानण्यात येते. त्यामुळे दिग्गज गुंतवणूकदार सुद्धा हा मुहूर्त चुकवत नाही. या काळात केलेली कमाई ही वर्षभर पुरते. या दिवशी पण 15 मिनिटांचे प्री-मार्केट सेशन होते. म्हणजे एकूण एक तास 15 मिनिटं मुहूर्त ट्रेडिंग चालते.

काय आहे मुहूर्त ट्रेडिंग

मुहूर्त ट्रेडिंग हा एक तासाचे शुभ व्यापारी सत्र मानण्यात येते. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा खास मुहूर्त साधल्या जातो. या दिवशी बाजारात केलेली गुंतवणूक शुभ मानण्यात येते. दिवाळीचा काळ कोणतेही नवीन काम करण्यासाठी शुभ मानण्यात येतो. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी केलेली गुंतवणूक वर्षभरासाठी शुभ मानण्यात येते. त्यामुळे एक तासाचा मुहूर्त ट्रेडिंग वर्षभराच्या समृद्धीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानल्या जातो.

हे सुद्धा वाचा

या तारखेला खास सेशन

दिवाळीचा मुहूर्त ट्रेडिंग 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेदरम्यान होईल. मुहूर्त ट्रेडिंग दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक्सचेंजद्वारे आयोजीत करण्यात येणारे विशेष व्यापारी सत्र आहे. हे प्रतिकात्मक व्यापारी सत्र दरवर्षी आयोजीत करण्यात येते. यात मोठ्या संख्येने मोठे गुंतवणूकदार, ब्रोकर्स, किरकोळ गुंतवणूकदार हे सहभागी होतात.

गेल्या वर्षी पण साधला मुहूर्त

या विशेष व्यापारी सत्रात खास ट्रेड्सचे सेटलमेंट त्याच दिवशी करण्यात येते. सर्वच ट्रेड सेटल करण्यासाठी 15 मिनिटांचे प्री-ओपनिंग आणि क्लोजिंग सेशन पूर्ण करण्यात येते. 2022 मध्ये शेअर बाजार (NSE आणि BSE) 24 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी 6.15 वाजता सुरु झाला आणि 7.15 वाजता बंद झाला. गेल्या दोन मुहूर्त सत्रात शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसून आले. 2022 मधील मुहूर्त ट्रेडिंग वेळी बीएसई आणि एनएसईमध्ये प्रत्येकी 0.88 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. तर 2021 मध्ये दोन्ही निर्देशांकात 0.49 टक्क्यांची वाढ दिसून आली.

या दिवशी बाजार असेल बंद

  • 14 नोव्हेंबर, दिवाळी, बळी प्रतिपदा
  • 27 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती
  • 25 डिसेंबर, नाताळ, ख्रिसमस
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.