Dolly भाईच्या चहाची वाढली रंगत; आता हरियाणाचे मुख्यमंत्री पण झाले जबरा फॅन
Dolly Chaiwala CM : नागपूरचा डॉली चहावाल देशातच नाही तर जगात व्हायरल झाला आहे. भारतातीलच नाही तर परदेशातील अनेक पाहुणे त्याच्या चहाचा अस्वाद घेण्यासाठी येतात. बिल गेट्सने त्याच्या हाताचा चहा चाखल्यापासून तो देशभरात प्रसिद्ध झाला. आता हरियाणाचे सीएम सुद्धा त्याच्यावर फिदा झाले.
नागपूर येथील डॉली चहावाला हा जगभरात लोकप्रिय झाला आहे. भारतापासून ते परदेशात त्याची चर्चा सुरु आहे. दूरदूरुन अनेक लोक त्याचा चहा पिण्यासाठी येतात. कष्टातून त्याने हे नाव कमावलं आहे. आता त्याचा हातचा चहा पिऊन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी पण त्याचे जबरा फॅन झाले आहेत. डॉलीने त्यांच्यासाठी चहा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चहा तयार करुन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो चाखला. त्यावर डॉलीने चहा चांगला झाला की नाही, अशी विचारणा केली. मुख्यमंत्र्यांनी चहाला मनमुराद दाद दिली. चहाचा स्वाद जबरदस्त असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
डॉलीच्या चहाने मुख्यमंत्री मंत्रमुग्ध
सोशल मीडियावर याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री त्यांचे मंत्री आणि मित्रांसह चहाची तलफ भागविण्यासाठी डॉलीच्या कट्यावर गेले. डॉलीने मुख्यमंत्र्यांसाठी चहा तयार केला. त्यानंतर तीन वेगवेगळ्या काचेच्या ग्लासमध्ये तो चहा ओतला. त्यातील एक ग्लास त्याने मुख्यमंत्री सैनी यांच्याकडे दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चहा पिला. चहाचा अस्वाद घेतल्यानंतर त्यांनी डॉलीच्या चहाला मनमुराद दाद दिली.
यापूर्वी बिल गेट्सने चाखला स्वाद
यापूर्वी डॉलीच्या चहाचा जगातील सर्वात श्रीमंतांपैकी बिल गेट्स याने पण आस्वाद घेतला. बिल गेट्सने त्याचा चहा पिल्यानंतर डॉली एकदम चर्चेत आला. त्यासाठी तो हैदराबाद येथे गेला होता. बिल गेट्सने त्यांच्या सोशल हँडलवरुन याविषयीचा व्हिडिओ अपलोड केल्यावर तो व्हायरल झाला आणि डॉली, त्याचा चहा प्रसिद्धीच्या झोतात आला. डॉली त्याच्या खास पद्धतीने चहा तयार करतो, त्याची एकदम चर्चा रंगते. तो दूरुन चहामध्ये दूध टाकतो. डॉली त्याची हेअरस्टाईल आणि फॅशन याने पण त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
#WATCH | Gurugram: Haryana CM Nayab Singh Saini had tea from Nagpur’s Dolly tapri chaiwala. pic.twitter.com/K9NGPjYV5H
— ANI (@ANI) April 23, 2024
डॉलीची एक दिवसाची कमाई तरी किती
IMDB Stars Portal नुसार, डॉली चहा विक्रीतून एका दिवसात 2500 रुपये ते 3500 रुपयांपर्यंत कमाई करतो. डॉली एक कप चहाच्या विक्रीतून 7 रुपयांची कमाई करतो. तो दररोज जवळपास 400 कप चहा विक्री करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉलीची एकूण संपत्ती 10 लाख रुपये आहे.
इयत्ता 10 नंतर सोडले शिक्षण
डॉली चहावाला 16 वर्षांपासून नागपूरमध्ये चहाची टपरी चालवतो. चहाच्या चक्करमध्ये त्याने शिक्षण अर्धवट सोडले. इयत्ता 10 नंतर त्याने शिक्षण सोडले. अनेक लोक त्याच्या चहाचे चाहते आहेत. चहाच्या टपरीतून तो चांगली कमाई करतो. बिल गेट्सने त्याच्या हातची चहा पिऊन, त्याला मनमुराद दाद दिल्यानंतर अनेक जण त्यांच्या टपरीवर खास चहा पिण्यासाठी येतात.