LPG Cylinder Price: जगायचं कसं?, घरगुती गॅस 50 रुपयांनी महागला; आता एका सिलिंडरसाठी मोजा 999.50 रुपये

महागाईचा आणखी एख धक्का बसला आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आजपासून घरगुतील सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत.

LPG Cylinder Price: जगायचं कसं?, घरगुती गॅस 50 रुपयांनी महागला; आता एका सिलिंडरसाठी मोजा 999.50 रुपये
गॅसवरील सबसीडी कशी मिळवाल?Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 9:35 AM

मुंबई : देशात महागाई (Inflation) उच्च स्थरावर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांंच्याच दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे.  वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे ( gas cylinder) दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच इथून पुढे एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडरचे दर महागल्याने गृहिनीचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे.  एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ

एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. एक मेला व्यवसायिक सिलिंडरचे दर 104  रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यावेळी घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला होता. मात्र आज गॅस घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची  वाढ करण्यात आल्याने आता एका गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस दरवाढीसोबतच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात देखील सातत्याने वाढ सुरूच आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

एकीकडे सीएनजी, पीएनजी आणि आता एलपीजी गॅसच्या दरात वाढ  करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात तर सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या महिन्याभरात सीएनजीचे दर तीनदा वाढवण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे गेल्या महिन्यापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.  22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.