Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dominos Fast Delivery : गरमागरम पिझ्झासाठी अर्धा तास वाट कशाला पहायची भावा? आता तर इतक्या झटपट वाजणार दारावरची बेल आणि पिझ्झा तुमच्या हातात

Dominos Fast Delivery : खाद्यप्रेमींना घरपोच लवकर पिझ्झा मिळणार आहे..

Dominos Fast Delivery : गरमागरम पिझ्झासाठी अर्धा तास वाट कशाला पहायची भावा? आता तर इतक्या झटपट वाजणार दारावरची बेल आणि पिझ्झा तुमच्या हातात
पिझ्झा येईल पटकनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 5:25 PM

नवी दिल्ली : तुम्हाला आता पटकन घरपोच (Home Delivery) पिझ्झा मिळणार आहे. पिझ्झासाठी आता अर्धा तास वाट पाहण्याची गरज नाही. त्यापेक्षा ही कमी वेळात तुमच्या जिभेचे चोचले पुरविल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पिझ्झा पटकन गटकावून टाकाल. भारतात डॉमिनोज पिझ्झाने (Dominos Pizza) यासाठी खास ऑफर (Offer) आणली आहे. त्यामुळे खाद्यप्रेमींना पिझ्झा डिलिव्हरी बॉयची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यांना गरमागरम पिझ्झा काही मिनिटातच उपलब्ध होणार आहे.

घरपोच पिझ्झासाठी आता अर्धातास वाट पाहण्याची गरज नाही. आता केवळ 20 मिनिटात पिझ्झाची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. डॉमिनोज पिझ्झा विक्री करणाऱ्या ज्युबिलंट फूडवर्क्सने (Jubilant Foodworks) 20 मिनिटात पिझ्झा घरपोच पोहचविणार असल्याचा दावा केला आहे. कंपनीने या नवीन सेवेची नुकतीच घोषणा केली आहे.

ही सेवा देशातील जवळपास 20 राज्यांत सुरु होणार आहे. पण ही सेवा कोणत्या शहरात सुरु करण्यात येणार आहे. कोणत्या शहरातील पिझ्झा प्रेमींना त्याचा फायदा होणार याची माहिती कंपनीने जाहीर केली नाही. ज्युबिलंट फूडवर्क्स कंपनीने यापूर्वी 30 मिनिटात घरपोच पिझ्झाचा प्रयोग यशस्वी केला आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीने एक निवेदन जारी केले आहेत. त्यात त्यांनी कोणत्या शहरात ही सेवा पहिल्या टप्प्यात सुरु होऊ शकते, याची माहिती दिली आहे. त्यात एकूण 20 शहरं असतील. मुंबई, दिल्ली, कोलकता, बेंगळुरु, चेन्नई या प्रमुख शहरांसह इतर शहरांचा यामध्ये समावेश असेल. या शहरात कंपनीची अनेक आऊटलेट आहेत.

जलद पिझ्झा पोहचवता यावा यासाठी त्यांच्या स्टोरमध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहे. त्यात तंत्रज्ञानही अद्ययावत करण्यात येत आहे. तसेच काही नवीन स्टोर सुरु करण्याचाही विचार सुरु आहे. त्यामुळे कंपनीला 20 मिनिटात पिझ्झा डिलिव्हरी करता येईल.

जलद सेवा देताना, पिझ्झाचा स्वाद आणि दर्जा कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच डिलिव्हरी रायडर, बॉय यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही. डॉमिनोजचे प्रमुख रसेल वेनर यांच्या दाव्यानुसार, 20 मिनिटांच्या ऑफरच्या माध्यमातून कंपनी ग्राहक सेवेवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.