प्रत्येक शनिवारी, रविवार असेल सुट्टीचा वार, बँका राहतील बंद?

Bank Holiday | देशभरातील बँक कर्मचाऱ्यांची लवकरच चांदी होऊ शकते. कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचा आरोप बँक कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. पगार वाढीसह कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी हवी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याविषयीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठवला आहे.

प्रत्येक शनिवारी, रविवार असेल सुट्टीचा वार, बँका राहतील बंद?
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 3:15 PM

नवी दिल्ली | 6 डिसेंबर 2023 : जर मान्यता मिळाली तर पुढील वर्षात बँक कर्मचाऱ्यांचा आठवडा पाच दिवसांचा होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांनी शनिवार-रविवार अशी सुट्टी देण्याची मागणी रेटली आहे. गेल्या काही वर्षांपासून पाच दिवसांचा आठवडा करण्याची आणि विकंड सुट्टीची मागणी लावून धरण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठवला आहे. इतर पण अनेक मागण्या आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या डिसेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांनी संपाचा नारा पण दिला आहे. अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी याविषयीची माहिती दिली.

सध्या काय आहे स्थिती

केंद्र सरकारने भारताच्या सर्व बँकांसाठी 2015 मध्ये एक नियम लागू केला होता. त्यानुसार महिन्यातील दोन शनिवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर देशातील सर्वच बँका महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात. देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांना हा नियम लागू आहे. या दिवशी बँकांचे शटर डाऊन असते.

हे सुद्धा वाचा

अनेक वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांची मागणी

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक, गेल्या अनेक वर्षांपासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी करत आहेत. खासकरुन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी हा मुद्दा अनेकदा उचलून धरला आहे. यापूर्वी काही वेळा संप पुकारण्यात आला. त्यात हा मुद्दा अग्रक्रमाने पुढे आला होता. इंडियन बँक असोसिएशनचे सदस्य सार्वजनिक बँका, खासगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका, क्षेत्रीच ग्रामीण बँक आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थान या सर्वांनी पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी केली आहे. सध्या बँकिंग क्षेत्रात 1.5 दशलक्ष कर्मचारी आहेत.

वाढतील कामाचे तास

RBI ने याविषयीचा प्रस्ताव सादर केला असला तरी त्याबाबत काही निर्णय घेतला की नाही, याची माहिती अर्थराज्यमंत्री कराड यांनी दिली नाही. पण जर हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला तर कर्मचाऱ्यांना इतर दिवशी अधिक काम करावे लागेल. जर पाच दिवसांच्या आठवड्याचा स्वीकार केल्या गेला तर बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येक दिवशी 40 मिनिटं अधिक काम करावे लागेल. त्यांचे काम सकाळी 9:45 वाजता सुरु होईल आणि त्यांना संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत थांबावे लागेल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.