OYO हॉटेलच्या माध्यमातून कमाईच कमाई, तुम्ही असे झटपट व्हाल करोडपती, पण अगोदर करा हे काम

OYO Hotel Rooms : OYO हॉटेलमधून कमाई करायची आहे का? तुम्हाला या उद्योगातून लाखो रुपये छापता येतील. पण त्यासाठी या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. तासाभराच्या हिशोबाने रुम देऊन रितेश अग्रवाल याने कोट्यवधींची कमाई केली आहे. तुमचे पम असेच नशीब पालटू शकते.

OYO हॉटेलच्या माध्यमातून कमाईच कमाई, तुम्ही असे झटपट व्हाल करोडपती, पण अगोदर करा हे काम
होणार कमाईच कमाई
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 4:22 PM

कोणत्याही शहरात गेल्यावर राहण्याची काय व्यवस्था करावी, हा प्रश्न प्रवासाला निघतानाच मनाला छळतो. त्यावर भारतात OYO हा पर्याय समोर आला. या एका आयडियाने OYO चे मालक रितेश अग्रवाल यांना कोट्याधीश केले आहे. त्यांनी सर्वसामान्यांना एका तासासाठी स्वस्तात रुम देण्याच्या हिशोबाने कोट्यवधी रुपये छापले. पण तुम्हाला माहिती आहे का की OYO हॉटेलच्या माध्यमातून कशी कमाी करता येते ते? जर स्वस्तातील साखळी हॉटेल OYO च्या माध्यमातून कमाई करायची असेल तर हे वृत्त तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला पण कोट्यावधींची कमाई करता येईल.

हॉटेल व्यवसायात जोरदार कमाई होऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला ओयोची फ्रँचाईज घ्यावी लागेल. त्यामाध्यमातून तुम्हाला दुप्पट कमाई करता येईल. OYO एक असा व्यवसाय आहे, ज्यामुळे तुमच्या कमाईत वाढ होईल. पण ही फ्रँचाईज घेण्यापूर्वी नियम आणि अटींचे पालन करावे लागेल. OYO ची फ्रँचाईज घेण्यापूर्वी त्यासंबंधीची सर्व माहिती घ्या.

काय आहे OYO चे बिझनेस मॉडेल?

हे सुद्धा वाचा

OYO चे बिझनेस मॉडेल एका ॲग्रीकेटर सारखे काम करते. ग्राहकांना सेवा OYO रुम देते की अजून तिसरा पक्ष याच्याशी काही देणे घेणे नसते. OYO व्यवसाय हा UBER सारखा आहे. कारण त्यांची सेवा आणि उपलब्ध रुम याचा दर अगोदर निश्चित आहे.

जर तुम्ही OYO सोबत हातमिळवणी केली तर त्यासाठी अगोदर तुम्हाला 2 लाख रुपये मोजावे लागतील. सर्वात अगोदर ही सेवा सुरु करण्यासाठी तुमच्याकडे जवळपास 10 रुम, खोल्या उपलब्ध असाव्यात. या व्यवसायातील 20 टक्के रक्कम ओयो तर 80 टक्के कमाई ही हॉटेल मालकाला देण्यात येते. हॉटेलच्या मालकाला कर्मचाऱ्यांचे वेतन, भाडे आणि डागडुजीचा, स्वच्छता, वीज, पाणी बिल यांचा खर्च स्वत: करावा लागेल. ही फ्रँचाईज 3 आणि 5 वर्षांसाठी देण्यात येते.

व्यवसायसाठी असा करा अर्ज

OYO ची फ्रँचाईज घेण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला OYO च्या अधिकृत साईटवर जावे लागेल. त्याठिकाणी तुम्हाला JOIN OYO या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यावर तुमचे नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ओयोकडून रिक्वेस्ट कॉल निवडण्याचा पर्याय समोर येईल. त्यानंतर OYO तुम्हाला कॉल करेल. तुमच्या हॉटेलविषयीची संपूर्ण माहिती घेण्यात येईल. त्यात कागदपत्रांची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर OYO सोबत फ्रँचाईजसाठी एक करार करावा लागेल. पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेली. ही प्रक्रिया झाल्यावर दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करता येईल.

या करारातून होईल फायदा

आज OYO चा व्यवसाय देशभरात पसरला आहे. जर तुम्ही OYO ची फ्रँचाईज घेतली तर त्यातून तुम्हाला मोठा फायदा होईल. अनेक जण आता या रुम्समध्ये राहण्यास पसंती देतात. ओयोशी जोडल्या गेल्यानंतर तुमची मोफत जाहिरात, मार्केटिंग होते. ओयोच्या पार्टलवरुन अनेक लोक तुमच्या हॉटेलशी जोडल्या जातात. ओयोची मागणी दिवसागणिक वाढत आहे. त्यामाध्यमातून तुम्हाला मोठा नफा होईल. तुम्ही जितकी चांगली सेवा द्याल, तितका फायदा होईल.

OYO चा नफा किती?

लोकप्रिय पर्यटन स्थळापासून ते धार्मिक स्थळांच्या गल्लीबोळातील छोट्या छोट्या हॉटेल्सला जोडून आज OYO जगातील सर्वात मोठी हॉटेल चेन ठरली आहे. रितेश अग्रवाल यांच्या या स्टार्टअप कंपनीने नुकताच निकाल जाहीर केला. कंपनीने पहिल्यांदा नफा मिळवला आहे. कंपनीने 2023-24 जवळपास 229 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कंपनीनीची निव्वळ कमाई आहे. निव्वळ नफा 100 कोटी असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. लवकरच OYO चा आयपीओ बाजारात दाखल होत आहे.

परदेशात पसरला व्यवसाय

ओयोने देशात मोठे नेटवर्क तयार केले आहे. आता कंपनीने भारताबाहेर पण पाऊल ठेवले आहे. कंपनीने नुकतेच फ्रान्सचा केएंडजे कन्सल्टिंग व्यवसाय अधिग्रहित केला आहे. युरोपातील किरायावर घर देणारी कंपनी Checkmyguest Group हा व्यवसाय सांभाळत होती. शेअर स्विपिंगद्वारे ओयोने हा सौदा पूर्ण केला आहे.

रितेश अग्रवालची संपत्ती किती?

OYO हॉटेल्सने देशातील हॉटेल व्यवसायाची परीभाषा बदलवून टाकली आहे. अनेक दिग्गज हॉटेल्सच्या धोरणांना धक्का दिला आहे. या इंडस्ट्रीजला हादरा दिला आहे हे नाकारुन चालत नाही. ओयो हॉटेल्सचे संस्थापक रितेश अग्रवाल 2020 मध्ये जगातील सर्वात कमी वयाचे स्व-निर्मित अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या पूर्वी कायली जेनर यांचा क्रमांक आहे. केवळ 24 व्या वर्षी रितेश अग्रवाल याने ओयो हॉटेल्स लाँच केले आहे. आज त्याची 16,462 कोटींची संपत्ती आहे.

OYO Room वर 75 टक्के सवलत

बाहेर फिरण्याची हौस असेल तर राहण्यासाठी अनेक जण आता ओयोची निवड करतात. कारण या रुम स्वस्तात मिळतात. आता या रुम बुकिंगवर अधिक सवलत मिळणार आहे बुकिंगवर 75 टक्के डिस्काऊंट देण्यात येते. त्यामुळे यामाध्यमातून 500 ते 1000 रुपयांमध्ये बुक करु शकतात.

ओयो रुम बुक केल्यानंतर 75 टक्के डिस्काऊंट मिळवण्यासाठी तुम्हाला ओयोच्या अधिकृत साईटवर जावे लागेल. त्याठिकाणी MYOFFER कुपन मिळेल. हे कुपन तुम्ही वापरल्यास लागलीच 75 टक्के सवलत मिळेल. म्हणजे जर एखाद्या हॉटेलमध्ये रुमचे भाडे 4,850 रुपये असेल तर या ऑफरमुळे तुम्हाला भाडे केवळ 1,371 रुपये आकारले जाईल. तर ओयो रुमला 2,912 रुपये लागत असतील तर या ऑफरमुळे तुम्हाला केवळ 500 ते 600 रुपये खर्च येईल. प्रत्येक दिवशी ही ऑफर बदलत असते. ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी डिस्काऊंट मिळेल.

प्रत्येक दिवशी डिस्काऊंटमध्ये बदल

या ऑफर्स कमी कालावधीसाठी असतात. 75 टक्के डिस्काऊंटची ऑफर प्रत्येक दिवसासाठी नाही. पण ओयोच्या अधिकृत साईटवर बुकिंग करते वेळी काही ना काही सवलत मिळतेच. प्रत्येक दिवशी डिस्काऊंटमध्ये बदल होतो. किंमती कमी जास्त होता. ओयोच्या ॲपचा वापर केला तर तुम्हाला नेहमीच्या सवलतीपेक्षा 15 टक्के अधिक सवलत मिळेल. म्हणजे एखाद्या दिवशी ओयोकडून रुम बुकिंगवर 30 टक्के सवलत असेल आणि ओयोच्या ॲपचा वापर करुन बुकिंग केले तर 15 टक्के अधिक म्हणजे एकूण 45 टक्के सवलतीत रुम भाडे भरावे लागेल.

पण रुम बुक करताना ओयोच्या अधिकृत साईटवरुन ती बुक करा. कारण इतर संकेतस्थळावरुन तुम्ही ओयो रुम बुक करण्याचा प्रयत्न कराल. गुगलवर जाऊन एखादी दुसरीच वेबसाईटवरुन ओयो रुम बुक करण्याचा प्रयत्न कराल, तर तुमची फसवणूक होऊ शकते. सायबर फसवणुकीचे प्रकार वाढल्याने ओयो रुम बुक करताना सतर्क राहा.

आधार कार्ड देण्यापूर्वी वापरा ही ट्रिक

ओयो रुम वा हॉटेलमध्ये गेल्यावर ग्राहकांकडे आधार कार्डची मागणी करण्यात येते. अनेकदा आपण आपले मूळ आधार कार्डची प्रत अथवा त्याची फोटो कॉपी पाठवून देतो. पण कोणत्याही हॉटेलमध्ये असे सहज आधार कार्ड देऊ नका. त्यामुळे तुमचे बँके खाते खाली होऊ शकते. तुमची वैयक्तिक माहिती चोरून गैरवापर होऊ शकतो. आधार कार्ड देण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा कोणत्याही ठिकाणी Masked Aadhaar Card देण्याची सवय लावा. त्यामुळे तुमची माहिती गोपनीय राहिल.

याचा वापर करा

आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्रं आहे. याशिवाय सरकारची कोणती पण योजना, बँक खाते वा इतर अनेक सरकारी कामे होऊ शकत नाही. अनेक कामे आधार कार्ड वापरल्याशिवाय होत नाही. त्यामुळे आधार कार्ड शेअर करण्यापूर्वी त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Masked Aadhaar Card हे तुमच्या मूळ आधार कार्डचे एक गोपनीय स्वरूप आहे. यामध्ये आधार कार्डवरील पहिले 8 क्रमांक दिसत नाही. केवळ शेवटचे 4 क्रमांक दिसतात. त्यामुळे आधार कार्ड शेअर करताना तुमची अडचण होत नाही. मास्क आधार कार्ड डाऊनलोड करणे एकदम सोपे आहे.

सर्वात आधी uidai.gov.in या संकेतस्थळावर जा. माया आधार हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक करा. आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा भरा. त्यानंतर सेंड ओटीपी हा पर्याय निवडा. मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी नोंदवा आणि पडताळा प्रक्रिया पूर्ण करा. आता तुमच्यासमोर डाऊनलोड हा पर्याय समोर येईल. त्यावर क्लिक करा. त्यावेळी तुम्हाला मास्क आधार कार्ड हवे आहे का? अशी विचारणा होईल. हे आधारकार्ड डाऊनलोड झाल्यावर तुमच्या नावातील चार अक्षरं आणि तुमची DOB YYYY टाकून तुम्ही आधार कार्ड पाहु शकता.

शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.