Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज
आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या श्रीलंकेला (Sri Lanka) पुन्हा एकदा भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी (Fuel Import) 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे.
आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या श्रीलंकेला (Sri Lanka) पुन्हा एकदा भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी (Fuel Import) 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत श्रीलंकेच्या आर्थमंत्र्यांनी माहिती दिली. ते याबाबत बोलताना म्हणाले की, भारताने श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. हा श्रीलंकेसाठी सध्या परिस्थितीमध्ये मोठा आधार आहे. सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. आम्ही या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या संकटातून कसा मार्ग काढता येईल? याबाबत आयएफएमसोबत चर्चा सुरू आहे. श्रीलंका लवकरच या संकटातून बाहेर पडेल. अशी खात्री आहे. भारताने संकट काळात श्रीलंकेला मदत केली आहे, त्यासाठी आम्ही भारताचे आभार मानतो.
‘भारताकडून मदतीची अपेक्षा’
पुढे बोलताना अर्थमंत्र्यांनी म्हटले की, सध्या श्रीलंकेचे विदेशी मुद्रा भंडार झपाट्याने कमी होत आहे. आयातीसाठी पुरेशा प्रमाणात चलनसाठा नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. दुसरीकडे श्रीलंकेत माहागाई देखील गगनाला भिडली आहे. त्यामुळे वस्तूंच्या आयातीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. अशा स्थितीमध्ये श्रीलंका भारताकडून मदतीची अपेक्षा करत आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी 50 कोटी डॉलरच्या मदतीला मंजुरी दिली आहे. आम्हाला अशी आशा की, भारत क्रेडिट लाईनच्या रुपाने एक अब्ज डॉलरपर्यंत मदत करेल.
श्रीलंकेत बिकट परिस्थिती
श्रीलंकेची परिस्थिती बिकट बनली आहे. श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. इंधनाच्या आयातीसाठी पुरेसा चलनसाठा नसल्याने इंधन तुटवडा जाणू लागला आहे. इंधन तुटवड्यापाठोपाठ श्रीलंकेत वीज संकट देखील निर्माण झाले आहे. अन्नधान्य इतके महाग झाले आहे की, अन्नधान्य खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. श्रीलंकेत महागाई वाढल्याने सामान्य जनतेने सरकारवर रोष व्यक्त केला आहे. जनता आता सरकारविरोधात रस्त्यावर उतरू लागली आहे.
संबंधित बातम्या
RBI कडून सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 36 लाखांचा दंड! नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका
सोन्याची लंका अन्नाला ‘महाग’, जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, भारताकडूनही मदत