Economic Growth | भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा दाखवणार कमाल, चीनसह युरोपला फुटला घाम

Economic Growth | जागतिक घडामोडींचा भारतावर अनुकूल परिणाम होताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थांचे भारताकडे लक्ष लागले आहे. भारत सध्या जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पण कदाचित याच वर्षात, 2023 मध्ये भारत जगाला आश्चर्याचा मोठा धक्का देऊ शकतो. त्यामुळे चीनला घामटा येणार आहे. तर युरोप हैराण होणार आहे.

Economic Growth | भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा दाखवणार कमाल, चीनसह युरोपला फुटला घाम
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 9:40 AM

नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : कोरोना महामारीनंतर जागतिक पटलावर अनेक समीकरणं बदलली. रशिया-युक्रेन युद्ध गेल्या 19 महिन्यांपासून सुरु आहे. आता इस्त्राईल-हमास युद्धाने जगाला वेठीस धरले आहे. पण या काळात भारताची अर्थव्यवस्था तुफान वेगाने घौडदौड करत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला अजूनही सावरता आलेले नाही. उलट चीनची अवस्था अजून वाईट होण्याची भीती आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला पण फटका बसणार आहे. हा घटनाक्रम भारताच्या पथ्यावर पडत आहे. याच वर्षात, 2023 मध्येच भारत जगाला आश्चर्याचा मोठा धक्का देऊ शकतो. या धक्क्याने चीनची झोप उडणार आहे. तर युरोप हैराण होईल, असं काय करणार भारत?

S&P जागतिक रिपोर्टचा दावा काय

S&P Global India Manufacturing Report नुसार, भारत जगातील 5 सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाचा जीडीपी 2030 पर्यंत 7300 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर जपानला मागे टाकत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. तर आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. इतकंच नाही तर भारत युरोपला पिछाडीवर टाकेल. वर्ष 2021 आणि 2022 या दोन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे. यावर्षातही भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या ट्रॅकवर धावत आहे.

हे सुद्धा वाचा

अतिवेगाने धावणार अर्थव्यवस्था

मार्च 2024 मध्ये संपणाऱ्या अर्थव्यवस्थेत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 6.2-6.3 टक्के वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था गतिमानतेने वाढेल. एप्रिल-जून या तिमाहीत आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थवव्यस्थेचा वृद्धी दर 7.8 टक्के दिसून आला. पुढील वर्षात यामध्ये अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

जपान पडणार मागे

2022 मध्ये भारताचा जीडीपी 3500 अब्ज डॉलर होता. IMF च्या 16 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रिपोर्टनुसार, भारताची सध्याचा जीडीपी 3,730 अब्ज डॉलर आहे. हा जीडीपी 2030 पर्यंत 7300 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. आर्थिक विस्तार झपाट्याने होत असल्याने 2030 पर्यंत भारताचा जीडीपीतील वाटा जपानहून अधिक होईल.

भारत देणार धक्का

जर्मनीचा जीडीपी साईज 4200 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. जर्मनी याच आर्थिक वर्षात 2023 मध्ये जर्मनी जपानला मागे टाकण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षातच जर्मनीचा जीडीपी 4400 अब्ज डॉलरहून अधिक झाला. जर्मनी जपानच्या पुढे जाईल. भारताने ब्रिटेन आणि फ्रासला मागे रेटले आहे. या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरुन पुढील टप्प्यात दाखल होण्यासाठी आगेकूच करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर्मनीला पण भारताची टक्कर असेल. सध्या अमेरिका 25,500 अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.