AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

USA Defaulter : …तर जागतिक महासत्ता, अमेरिका सुद्धा होईल कर्ज बुडवी! काय म्हणाल्या अर्थमंत्री

USA Defaulter : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी देशाच्या सध्या स्थिती केवळ एका वाक्यात स्पष्ट केली, अमेरिका केव्हा पण कर्ज बुडवू शकते!

USA Defaulter : ...तर जागतिक महासत्ता, अमेरिका सुद्धा होईल कर्ज बुडवी! काय म्हणाल्या अर्थमंत्री
आर्थिक संकट गहिरे!
| Updated on: May 03, 2023 | 11:16 AM
Share

नवी दिल्ली : अमेरिका म्हणजे जगाची दादा. सर्वात मोठी अर्थसत्ता (US Economy). अमेरिकेत जाण्याचे, तिथे आलिशान आयुष्य जगण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. अमेरिका ही जादूई नगरी तर आहेच पण ती जगाची सावकार ही आहे. परंतु, आर्थिक मोर्चावर आता अनेक वाईट वार्ता येऊन धडकत आहेत. सुपरपॉवरच्या अनेक बँकांनी माना टाकाल्या तर काही बुडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आता तर अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. अर्थमंत्री जेनेट येलेन (Janet Yellen) यांनी अमेरिका कर्जाची परतफेड (Loan Repayment) करु शकत नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्वच अर्थतज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसऱ्या शब्दात अमेरिका पण कर्ज बुडवू शकते. मग तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांची बातच नको, नाही का?

काय म्हटल्या अर्थमंत्री अमेरिकीन अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी सोमवारी हा शाब्दिक बॉम्ब टाकला. त्यानुसार, सरकारने कर्ज कालावधी (Debt Ceiling) वाढविला नाही तर, अमेरिका 1 जून पासून रोखीतून बाहेर पडेल. त्यामुळे कर्ज चुकते करण्यात चुकवेगिरी करावी लागेल. कर्ज बुडवण्याची नौबत येऊ शकते. सरकारने जर मदत केली तर ही वेळ येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकन बँका संकटात गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेतील बँका बुडीत खात्यात चालल्या आहेत. मोठ-मोठ्या बँकांनी माना टाकल्या आहेत. या बँका दिवाळखोरीत गेल्याने केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. बँका डबघाईला आल्याने ठेवीदारांनी बँकांमधून एक लाख कोटी डॉलरपेक्षा अधिकची रक्कम काढून घेतली. त्यामुळे बँकांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. त्यातच भारत, चीन, रशियासह डॉलरचे अधिक्रमण कमी करण्याच्या तयारीत आहे. भारतीय रुपयाने तर मोठी आघाडी घेतली आहे.

पहिल्यांदाच डिफॉल्टचा धोका अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यादांच कर्ज बुडवेगिरीची घटना घडणार आहे. यापूर्वी अमेरिकेवर कधीही डिफॉल्ट होण्याची वेळ आली नव्हती. येत्या जुलैपर्यत अमेरिकेची कर्ज परतफेड करण्याचा कालावधी (Debt Ceiling)वाढविला नाही तर मात्र अमेरिकेवर मोठे आर्थिक संकट येऊ शकते. जर अमेरिका कर्ज बुडवा देश ठरला तर एका झटक्यात 70 लाखांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या जातील. अमेरिकेचा जीडीपी कोसळेल. जर अमेरिका आर्थिक गर्तेत अडकली तर त्याचा थेट परिणाम सर्वच देशांवर होईल. भारतावरही त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येईल.

यावर्षी जानेवारीत इशारा अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी यापूर्वी पण देश कर्ज बुडविण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला होता. जानेवारी महिन्यात त्यांनी अमेरिका जूनपर्यंत कर्ज परतफेडीत डिफॉल्ट करु शकतो, असे सांगितले होते. त्यामुळे आता अमेरिकन अर्थमंत्र्यांचा हा इशारा जगासाठी पण धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

आज व्याजदरांची घोषणा दरम्यान अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह आज व्याजदरांची घोषणा करण्याची शक्यता आहे. व्याजदरात पुन्हा 0.25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील या घडामोडींचा आता भारतावर परिणाम दिसेल. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कुठलीही वाढ केली नाही. पण जून महिन्यातील रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.