हिरो ग्रुपच्या चेअरमनवर ED ची मोठी कारवाई, मनी लाँड्रिग प्रकरणी पवन मुंजाल यांची 24 कोटींची मालमत्ता जप्त

हीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन कांत मुंजाल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.

हिरो ग्रुपच्या चेअरमनवर ED ची मोठी कारवाई, मनी लाँड्रिग प्रकरणी पवन मुंजाल यांची 24 कोटींची मालमत्ता जप्त
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 2:25 PM

नवी दिल्ली | 10 नोव्हेंबर 2023 : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी हीरो मोटोकॉर्प लिमिटेडचे ​​सीएमडी आणि अध्यक्ष पवनकांत मुंजाल यांच्या दिल्लीतील 3 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांची किंमत (अंदाजे) 24.95 कोटी रुपये आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 च्या तरतुदीनुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

54 कोटींचे मनी लाँड्रिंग !

ईडीने मुंजाल आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 54 कोटी रुपयांचे विदेशी चलन अथवा पैसा भारताबाहेर बेकायदेशीरपणे नेल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात होता.

पवनकांत मुंजाल यांनी इतर व्यक्तींच्या नावे विदेशी चलन जारी केलं आणि नंतर परदेशात वैयक्तिक खर्चासाठी त्याचा वापर केला, असं ईडीच्या तपासात उघड झालं आहे.

पैसा बाहेर पाठवण्यासाठी केलं काय ?

एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अधिकृत डीलर्सकडून विविध कर्मचाऱ्यांच्या नावे विदेशी चलन काढून घेतलं. आणि नंतर ते पवनकांत मुंजाल यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला देण्यात आलं. त्यांच्या रिलेशनशिप मॅनेजरने पवनकांत मुंजाल यांना त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक सहलींमध्ये वैयक्तिक खर्चासाठी रोख रक्कम किंवा कार्डद्वारे हे विदेशी चलन पाठवलं. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत एका व्यक्तीसाठी प्रतिवर्षी 2.5 लाख डॉलर्सची मर्यादा तोडण्यासाठी मुंजाल यांनी ही पद्धत अवलंबली होती.

ईडीने यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी पीके मुंजाल आणि संबंधित संस्था आणि लोकांच्या संदर्भात शोध मोहीम राबवली होती. आणि 25 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू तसेच डिजिटल पुरावे आणि इतर पुरावे जप्त केले होते. जप्त केलेल्या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये असल्याचे समजते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.