Edible Oil Price | खुशखबर, कंपन्यांचे मान्सून गिफ्ट! खाद्यतेल लवकरच 30 रुपयांनी स्वस्त, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यासाठी दरपत्रक जाहीर

Edible Oil Rate News : अनेक तेल उत्पादक कंपन्यांनी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात एक लिटरची बाटली आणि पाऊच्या किंमतीत 30 रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे.

Edible Oil Price | खुशखबर, कंपन्यांचे मान्सून गिफ्ट! खाद्यतेल लवकरच 30 रुपयांनी स्वस्त, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यासाठी दरपत्रक जाहीर
खाद्यतेल स्वस्त Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 6:57 PM

Edible Oil Price : गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या किचनचे बजेट (Kitchen Budget) आता आणखी स्वस्त होणार आहे. तर घराच्या भाजीला स्वस्ताईची फोडणीने चव येणार आहे. खाद्यतेल (Edible Oil) लवकरच 30 रुपयांनी स्वस्त (Cheaper) होणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (DFPD) याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट येईल. एवढंच नाही तर सरकार खाद्यतेलावरील सेवा शुल्कात अजून कपात करण्याची ही शक्यता आहे. सरकारने यासाठी कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत खाद्यतेल घरातील किचनमध्ये गोडवा आणेल हे नक्की. एक लिटरची (One Liter) बाटली आणि पाऊच्या किंमतीत 30 रुपयांच्या कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. मध्यंतरी तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घराचे बजेट वाढले होते आणि सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळला होता.

कंपन्यांची दर कपात

अडाणी विल्मर कंपनीने त्यांच्या खाद्यतेल उत्पादनावरील दरात 10 ते 30 रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. तर जेमिनी एडिबल अँड फॅट्स कंपनीने ही त्यांच्या उत्पादनावर 8 रुपये ते 30 रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. इमामी अॅग्री कंपनीने एमआरपीवर 35 रुपयांपर्यंतची कपात केली आहे. कंपन्यांच्या या कपात धोरणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर दिसून येईल. त्यांना पहिल्यापेक्षा स्वस्त खाद्य तेल खरेदी करता येईल. मदर डेअरीने सुद्धा त्यांच्या खाद्यतेलाच्या किंमती उतरवल्या आहेत. त्यांनी तेलाच्या किंमतीत 15 रुपये प्रति लिटर कपात केली आहे. यामध्ये सोयाबीनचे तेल आणि राईसब्रान तेलाचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

बैठकीनंतर तेल कपातीवर तोडगा

सरकारने नुकतीच तेल उत्पादक कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सामान्य जनतेवरील खाद्यतेलामुळे वाढलेला भार कमी करण्यावर जोर देण्यात आला. एवढेच नाही तर कंपन्यांकडून सेवा शुल्काविषयी कंपन्यांकडून सूचना ही मागवण्यात आल्या आहेत. या बैठकीनंतर कंपन्यांनी तातडीने त्यांच्या तेलाच्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.