Electricity (Amendment) Bill 2021: मोबाईल कंपन्यांप्रमाणे वीज कंपनी बदलू शकता, ग्राहकांना पर्याय मिळणार

हे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा सरकारचा मानस आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी पावसाळी अधिवेशन संपणार आहे.

Electricity (Amendment) Bill 2021: मोबाईल कंपन्यांप्रमाणे वीज कंपनी बदलू शकता, ग्राहकांना पर्याय मिळणार
electricity bill
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 12:58 PM

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळ येत्या काही दिवसांत विद्युत (संशोधन) विधेयक 2021 (Electricity (Amendment Bill, 2021) मंजूर करण्याचा विचार करण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दूरसंचार सेवांप्रमाणेच वीज ग्राहकांनाही अनेक सेवा पुरवठादारांमध्ये त्यांच्या आवडीचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. सरकारी सूत्राने सांगितले की, वीज (दुरुस्ती) विधेयक 2021 पुढील काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आणि मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. हे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा सरकारचा मानस आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी पावसाळी अधिवेशन संपणार आहे.

नवीन 17 विधेयकांपैकी वीज (दुरुस्ती) विधेयकदेखील

12 जुलै 2021 रोजी जारी झालेल्या लोकसभेच्या बुलेटिननुसार विद्यमान संसदेच्या अधिवेशनात सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन 17 विधेयकांपैकी वीज (दुरुस्ती) विधेयकदेखील आहे. या विधेयकात वीज ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्येसुद्धा ठरविण्यात आलीत.

वितरण व्यवसायामधून परवाना रद्द केला जाणार

बुलेटिनमध्ये सांगितले की, वीज कायद्यात प्रस्तावित केलेल्या दुरुस्तींसह वितरण व्यवसायावरून परवाने रद्द केले जातील आणि त्यामध्ये स्पर्धा होईल. यासह प्रत्येक आयोगात कायदेशीर पार्श्वभूमीचा सदस्य नियुक्त करणे आवश्यक असेल. याशिवाय विद्युत अपीलीय न्यायाधिकरण (APTEL) ला बळकट करण्याची तसेच नूतनीकरणयोग्य खरेदी वचनबद्धता (RPO) पूर्ण न करण्यासाठी दंड करण्याची तरतूदही असेल.

वीज वितरण कंपन्यांकडून 3.03 लाख कोटी रुपयांच्या योजनेस मान्यता

आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (CCEA) वीज वितरण कंपन्यांसाठी (डिस्कॉम्स) 3.03 लाख कोटी रुपयांच्या पंचवार्षिक सुधार-आधारित योजनेस मान्यता दिली. चालू आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने निकालावर आधारित सुधारणांशी जोडलेली वीज वितरण योजना जाहीर केली होती. कोविड 19 साथीच्या दुसर्‍या लहरीनंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेजचा भाग म्हणून ही योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केली. रिफॉर्म्स आउटकम लिंक्ड पॉवर डिस्ट्रीब्यूशन योजनेंतर्गत पायाभूत सुविधा, सिस्टम अपग्रेडेशन, क्षमता वाढवणे आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी डिस्कॉम्सना आर्थिक मदत दिली जाईल.

संबंधित बातम्या

कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला पेन्शन मिळणार, जाणून घ्या EPFO चे नियम

खाली दुकान आणि वर घर, जाणून घ्या प्राप्तिकर नियम काय, किती पैसे कापणार?

Electricity (Amendment) Bill 2021: Like mobile companies, power companies can change, consumers will get options

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.