Electricity Bill News : जनतेला वीज बिलाचा शॉक! प्रति युनिट दोन रुपयांच्या वाढीचा करंट, दोन वर्षांची कसर भरून काढणार ?

Electricity Shock to Consumer : महागाईचे चटके सहन करणा-या महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील जनतेला वीज दर वाढीचा शॉक बसू शकतो, किती वाढू शकतात किंमती जाणून घेऊयात

Electricity Bill News : जनतेला वीज बिलाचा शॉक! प्रति युनिट दोन रुपयांच्या वाढीचा करंट, दोन वर्षांची कसर भरून काढणार ?
वीज दरवाढीचा शॉकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 7:14 PM

Electricity Bill Hike News : महागाईचे (Inflation) चटके कमी होते की काय म्हणून आता राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा (Electricity bill hike shock) शॉक सहन करावा लागणार आहे. बिल वाढीचा शॉक लवकरच राज्यातील ग्राहकांना बसेल. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात वीज दरात कसलीही वाढ करण्यात आली नव्हती. मध्यंतरी दर वाढीचा प्रस्ताव आला होता. मात्र तो टाळण्यात आला होता. कोरोना महामारीचे (Covid-19) कारण देत ही दरवाढ टाळण्यात आली होती. परंतू, वीज उत्पादन खर्च वाढल्याने आणि कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी आता वीज दरवाढ करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा दावा वीज कंपन्यांनी केला आहे. महाराष्ट्रात युनिटमागे दोन रुपये वीज वाढ होण्याचा दावा झी बिझनेसने केला आहे तर देशाची राजधानी दिल्लीतील विद्युत विनियामक आयोगाने(DERC) दिल्लीतंर्गत विविध भागात वीजेच्या दरात 2 ते 6 रुपये वाढीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे तेथिल ग्राहकांना वीजेचा मोठा शॉक लागला आहे.

राज्यात युनिटचा हिशेब

महाराष्ट्रात नागरिकांना पुढील 5 महिने वीज बिल वाढीचा झटका बसू शकतो. जर तुम्ही महिन्याला 300 युनिट पेक्षा जास्त विद्युत वापर करत असाल तर तुम्हाला 2 रुपये प्रति युनिट बिल अधिक द्यावे लागेल. वाढता वीज उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी ही दरवाढीची सोय करण्यात आल्याचा विद्युत मंडळाने दावा केला आहे. वीज बिलातील ही वाढ जून ते ऑक्टोबर दरम्यान राहील.

हे सुद्धा वाचा

गेल्या 2 वर्षांपासून किंमतीत वाढ नाही

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड(MSEDCL) यांच्या दाव्यानुसार, गेल्या 2 वर्षांत इंधन किंमतीतीत मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे ग्राहकांकडून कंपनीने कुठलीही दरवाढ न करता ज्यादा बिल आकारले नाही. परंतू यंदा इंधन दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील 5 महिने ग्राहकांकडून हा वाढीव खर्च वसूल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरवाढीचा शॉक केवळ घरगुती वापरकर्त्या ग्राहकांनाच बसेल असे नाही तर औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनाही वीजदरवाढीचा शॉक सहन करावा लागणार आहे.

किती वाढतील दर

  1. संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे 3.3 कोटी विद्युत ग्राहक आहेत
  2. एमएसआडीसीएल च्या म्हणण्यानुसार, घरगुती ग्राहक जर 0-100 युनिट वीज वापर करतील तर त्यांना 65 पैसे प्रति युनिट अधिक पैसे मोजावे लागतील
  3. तर 101-300 युनिट विद्युत वापर करणा-या ग्राहकाला 1 रुपया 45 पैसे प्रति युनिट जास्त मोजावे लागतील
  4. 301-500 युनिट विद्युत वापर असणा-या ग्राहकांच्या खिश्यावर प्रत्येक बिलात प्रति युनिट 2.05 रुपयांचा बोजा पडेल
  5. तर 500 युनिट पेक्षा अधिक विद्युत वापर करणा-या ग्राहकांना प्रति युनिट 1 रुपये 35 पैसे तर व्यावसायिक ग्राहकांना 2.20 रुपये प्रति युनिट अधिभार पडेल
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.