Elon Musk : काय दिवस आले भावावर! एलॉन मस्क याला कार्यालयाचं भाडं ही देता येईना, टेबल,खूर्चीचा ऑनलाईन लिलाव
Elon Musk : ट्विटर खरेदी केल्यापासून एलॉन मस्कवर गरिबी ओढावली आहे. काय दिवस आलेत भावावर..
नवी दिल्ली : टेस्ला आणि इतर कंपन्यांमधून जबरदस्त कमाई करणारे जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांचे ग्रहमान फिरले आहेत. ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय त्यांची घोडचूक ठरत आहे. ट्विटर खरेदीपासून मस्क यांचे फासे पलटले आहेत. त्यांना मोठं नुकसान सहन करावे लागले. आता परिस्थिती अशी आहे की, ट्विटरच्या ऑफिसचे भाडे (Fare Of Twitter Office) ही चुकवणं अवघड जात आहे. खर्च भागविण्यासाठी कार्यालयीन वस्तूंच्या विक्रीची नामुष्की ओढावली आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, ट्विटरच्या कार्यालयातील 631 वस्तूंची ऑनलाईन विक्रीसाठी लिलाव (Selling Twitter Items) करण्यात आला आहे. ट्विटरचे लोढणे गळ्यात अडकल्याने मस्क यांची पुरती फजिती झाली आहे.
ट्विटरच्या कार्यालयाचे भाडे थकल्याचे वृत्त मध्यंतरी आले होते. आता खर्च आणि भाडे जमा करण्यासाठी ओस पडलेल्या कार्यालयातील वस्तूंचा लिलाव करण्यात येत आहे. हेरिटेज ग्लोबल पार्टनर्स (Heritage Global Partners Inc) हे लिलाव करत आहेत. वस्तू विक्रीसाठी 27 तास ऑनलाईन लिलाव सुरु राहणार आहे.
मस्क पूर्वी 340 अरब डॉलरच्या संपत्तीचे धनी होते. पण गेल्या वर्षी ट्विटर खरेदीचा वेडेपणा त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्यामागे शुल्ककाष्ट लागले. मस्क यांना आतापर्यंत 200 डॉलरचे नुकसान सहन करावे लागले. ट्विटर खरेदीसाठी त्यांनी 44 अरब डॉलर खर्च केले. या खरेदीतून निराशा आणि नुकसानच त्यांच्या पदरात पडली.
ट्विटर खरेदीनंतर प्रचंड नुकसान झाले. हा खर्च भरुन काढण्यासाठी मस्क यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा कमी अथवा बंद केल्या. काही कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन बैठकीतच राजीनामा सत्र सुरु केले. ट्विटरमध्ये प्रचंड गोंधळ सुरु असून त्याचा फटका ट्विटर वापरकर्त्यांनाही बसला आहे.
आता परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, खर्च भागविण्यासाठी भक्कास कार्यालयातील उरले-सुरले सामान विक्रीचा सपाटा लावण्यात आला आहे. या निलामीतून येणाऱ्या पैशात कार्यालयीन खर्ची किती दिवस करता येईल, हे सांगणे अवघड आहे.
ब्लूमवर्ग की एका रिपोर्टनुसार, ट्विटर (Twitter) त्यांच्या सॅन फ्रांसिस्को या मुख्य कार्यालयातील सामान, वस्तूंची विक्री करणार आहे. त्यासाठी लिलाव जाहीर करण्यात आला आहे. 27 तास लिलाव सुरु राहील. हेरिटेज ग्लोबल पार्टनर्स इंक (Heritage Global Partners Inc) द्वारा लिलाव करण्यात येत आहे.
Wild to see the Twitter office on auction. Board room tables, phone booths, chairs, monitors… even the Twitter bird statue. Great memories from a different era. https://t.co/kLOx69ZbeI pic.twitter.com/BFfvFy6Pg4
— Kevin Weil ?? (@kevinweil) January 15, 2023
या लिलावात 631 वस्तूंच्या विक्रीची योजना आहे. यामध्ये व्हाईट बोर्ड, डेस्क, टेबल, खूर्ची, KN95 चे 100 हून अधिक बॉक्स, डिझायनर खूर्ची, कॉफी मशीन, iMacs, स्टेशनरी, बाईक स्टेशन, चार्जिंग मशीन आणि काही उपकरणांचा समावेश आहे.
लिलावात कंपनीच्या आठवणीतील वस्तूंमध्ये ट्विटरच्या चिमणीचे छायाचित्र आणि एक “@” या शिल्पाचा समावेश आहे. नियॉन लोगोची किंमत 17,500 डॉलर असून त्यासाठी 64 जणांनी बोली लावली आहे. ट्विटरच्या पुतळ्यासाठी 55 जणांनी बोली लावली. त्याची किंमत 16,000 डॉलर होती. तर “@” या प्रतिकाचं शिल्पासाठी 4,100 डॉलर किंमत लावण्यात आली असून 52 जणांनी बोली लावली आहे.