Twitter : बोंबला, ब्लू टिकसाठीच नाही तर ट्विटर वापरासाठीही मोजावा लागणार पैसा..काय आहे मस्कचा मास्टर प्लॅन..

Twitter : ब्लू टिकसाठीच नाही तर ट्विटर वापरासाठीही सामान्य वापरकर्त्यांच्या खिशाला चाट पडण्याची शक्यता आहे..

Twitter : बोंबला, ब्लू टिकसाठीच नाही तर ट्विटर वापरासाठीही मोजावा लागणार पैसा..काय आहे मस्कचा मास्टर प्लॅन..
चला, पैसे मोजाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 3:25 PM

नवी दिल्ली : जर तुम्हाला वाटत असेल की ब्लू टिक (Blue Tick) धारकांनाच एलॉन मस्कच्या (Elon Musk) व्यावसायिक धोरणांचा भार वाहवा लागेल. तर हा तुमचा भाबडेपणा आहे. या भाबडेपणाची किंमत लवकरच ट्विटर वापरकर्त्यांना (Twitter Users) बसणार आहे. एलॉन मस्क हा पक्का व्यावसायिक माणूस (Businessman) आहे आणि तो लवकरच त्याचे कसब सिद्ध करणार आहे..त्याचा तुम्हाला काय फटका बसेल ते लवकरच तुम्हाला कळेलच..

मस्क लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार, तो सर्वसामान्य वापरकर्त्याकडूनही महिन्या काठी एक ठराविक रक्कम वसूल करण्याची तयारी करत आहे. एका रिपोर्टमध्ये याविषयीचा दावा करण्यात आला आहे.

साध्या शब्दात सांगायचे तर, तुम्ही ब्लू टिकचे वापरकर्ते असा वा नसा, तुम्ही ट्विटरचा वापर करता म्हणजे, तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम द्यावी लागणार हे नक्की. त्यासाठी मस्क एक योजना आखत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

अहवालानुसार, मस्क ट्विटर युझर्ससाठी सब्सक्रिप्शन(Subscription) योजना घेऊन येऊ शकतात. म्हणजे ट्विटर वापरासाठी अथवा त्यावर पोस्ट करण्यासाठी यापुढे वापरकर्त्याला काही ना काही रक्कम अदा करावी लागेल.

मस्कने ट्विटरसाठी खूप पैसा ओतला आहे. ही रक्कम त्याला वसूल करायची आहे. त्यामुळे सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून मस्क सरळसरळ कमाई करु इच्छित आहे.

सुरुवातीला ट्विटर हे संपूर्णतः शुल्क मुक्त असेल. त्याच्या वापरासासाठी कोणालाही शुल्क द्यावे लागणार नाही, असा नियम होता. पण हा नियम मस्क बासणात गुंडाळणार असल्याचे एकूण चित्र आहे.

योजनेनुसार, काही दिवस युझर्सला प्लॅन अंतर्गत फ्री ऑफर देण्यात येईल. खाते वापरासाठीची हा निःशुल्क कालावधी संपला की युझर्सला पुढे पैसे मोजावे लागतील. ट्विटरच्या माध्यमातून थेट कमाईसाठी मस्क सध्या जोरदार प्रयत्न करत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.