Elon Musk : एलॉन मस्कने करुन दाखवले, श्रीमंतांच्या यादीत असा पटकवला पहिला क्रमांक

Elon Musk : एलॉन मस्क जगातील श्रीमंत व्यक्ती ठरला आहे. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार त्याने श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक पटकवला आहे.

Elon Musk : एलॉन मस्कने करुन दाखवले, श्रीमंतांच्या यादीत असा पटकवला पहिला क्रमांक
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 10:28 AM

नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. टेस्लाचे सीईओ मस्क यांनी फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकले. एलॉन मस्क यांच्या संपत्ती गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. पॅरिस ट्रेडिंगचे बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या LVMH च्या शेअरमध्ये 2.6 टक्क्यांची घसरण झाली. या घसरगुंडीचा एलॉन मस्कला फायदा झाला. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्समध्ये या वर्षी पहिल्या क्रमांकासाठी रस्सीखेच सुरु होती. कधी एलॉन मस्क तर कधी बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) टॉपवर होते. वर्षभरात अरनॉल्ट पहिल्या क्रमांकावर कायम होते. त्यांना मागे टाकणे मस्क यांना जमले नाही. त्यातच ट्विटर खरेदीने मस्क यांना गोत्यात आणले होते.

बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत घसरण बर्नार्ड अरनॉल्ट हे 74 वर्षांचे बिझनेस टायकून आहेत. डिसेंबर 2022 मध्ये मस्क यांना मागे टाकत ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. अरनॉल्ट यांनी LVMH ची स्थापना केली. त्यांच्याकडे लुई वुईटन, फेंडी आणि हेनेसी सह इतर अनेक ब्रँड आहेत. ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार, चीनचा आर्थिक वेग मंदावल्याने लक्झरी सेक्टरमध्ये कमी आली आहे. त्यामुळे एलव्हीएमएचच्या शेअरमध्ये एप्रिलनंतर जवळपास 10 टक्क्यांची घसरण झाली.

1 दिवसात 11 अब्ज डॉलरचे नुकसान एकावेळी अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती एका दिवसांत 11 अब्ज डॉलरने कमी झाली. तर बुधवारी त्यांना एकूण संपत्ती 5.25 अब्ज डॉलरचा फटका बसला. आता बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलर आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 24.5 अब्ज डॉलरची वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती किती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली. संपत्ती 192 अब्ज डॉलर झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती बुधवारी 1.98 अब्ज डॉलरची वाढ झाली. यावर्षी त्यांच्या संपत्ती 55.3 अब्ज डॉलरची भर पडली.

टेस्लाचा महसूल घसरला ट्विटरपेक्षा मस्क याला खरी चिंता टेस्लाची लागलेली होती. कारण मार्च तिमाहीत कंपनीला जोरदा प्रदर्शन करता आले नाही. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के कमी रोखीचा व्यवहार केला. ईव्ही उत्पादनाला उठाव मिळावा यासाठी कंपनीने ईव्हीच्या किंमती मोठ्या प्रमाणात घटविल्या. कारण यावर्षाच्या सुरुवातीला किंमतींपेक्षा ईव्ही मार्केटमध्ये उत्पादनांना मागणी नव्हती. त्यांचा स्टॉक 60 टक्क्यांनी पडला होता. पण आता मस्क टेस्लाकडे लक्ष देणार आहे. ईव्हीच्या किंमती वाढविण्याचे संकेत पण मस्क यांनी दिले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.