Elon Musk: ट्विटरसाठी मस्क यांची भयावह चाल..कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार..

Elon Musk: ट्विटरसाठी जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांनी इतक्या टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिल्या जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे..

Elon Musk: ट्विटरसाठी मस्क यांची भयावह चाल..कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार..
कर्मचारी कपात?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 8:32 PM

नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचा (Tesla Company) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) आणि ट्विटर डील (Twitter Deal) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. पण त्यापेक्षा चर्चा होत आहे ती, मस्क यांच्या एका खतरनाक योजनेची..डील पूर्ण करण्यासाठी मस्क कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..

ट्विटर आणि एलन मस्क यांच्यात करार सुरु झाल्यापासून एवढी मोठा निधी उभारण्यासाठी मस्क काय काय करु शकतात, याची चर्चा रंगली होती. पण या चर्चेत आता नवा ट्विस्ट आला आहे. यामुळे अगोदरच महागाईचा सामना कराव्या लागत असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी वाचविण्याची चिंता लागली आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या एका अहवालानुसार, ही डील होण्यासाठी ट्विटरच्या 7500 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 75 टक्के कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. अर्थात हा अंदाज आहे, याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

पण वाशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, कंपनीत काही दिवसात मोठ्या प्रमाणात टाळेबंदी लागू शकते. मस्क यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना याविषयीची माहिती दिल्याचा दावा या अहवालात करण्यात आलेला आहे.

दुसरीकडे रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही येत्या काही दिवसात ट्विटरमध्ये कर्मचारी कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. अहवालानुसार, ट्विटरचे सध्याचे व्यवस्थापन या योजनेवर काम करत आहे. त्यानुसार, पेरोलवरील 800 कोटी डॉलरची कपात करण्याची योजना तयार आहे.

यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. पण नव्या धोरणानुसार, कर्मचारी कपात करण्यावर भर देण्यात येत असून पायाभूत सुविधाही कमी करण्यात येणार आहे.

परंतु, अद्याप मस्क अथवा त्यांच्या गुंतवणूकदारांनी या कर्मचारी कपातीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच ट्विटरकडूनही या बाबतीत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेली नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.