Elon Musk : म्या चुकलो जी! ताप झाला नुसता डोक्याला, एलॉन मस्क करणार या व्यक्तीला Twitter ची विक्री

Elon Musk : एलॉन मस्क यांना ट्विटर खरेदीचा कोण पश्चाताप होत आहे. ट्विटर खरेदीचा नुसता डोक्याला ताप झाल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. ते या व्यक्तीला ट्विटरची विक्री करणार आहे.

Elon Musk : म्या चुकलो जी! ताप झाला नुसता डोक्याला, एलॉन मस्क करणार या व्यक्तीला Twitter ची विक्री
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 6:32 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) याला ट्विटर खरेदीचा कोण पश्चाताप झाला. ट्विटर खरेदीचा डोक्याला ताप झाल्याचा दावा मस्क याने केला आहे. आपल्या अतरंगी स्वभावासाठी मस्क ओळखण्यात येतात. ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून आपले सूख हिरवल्याची भावना त्याने व्यक्त केली. मस्क याच्या दाव्यानुसार, ट्विटर खरेदीनंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही खरेदी डोक्याला ताप देणारी ठरली. ट्विटर कंटाळवाणे नसले तरी ते एका रोलकोस्टर राईडसारखे असल्याचा मस्कने दावा केला.

Twitter Share एलॉन मस्क यांनी त्यांच्या दुखाला वाट मोकळी करुन दिली. मस्क यांना ट्विटर खरेदी करायचे नव्हते. तर त्यांना ट्विटरचे शेअर खरेदी करायचे होते. पण त्यांनी जोश जोशमध्ये ट्विटरचा करार करुन टाकला. त्यानंतर त्यांना ट्विटर खरेदी करणे भाग पडले. एलॉन मस्क ट्विटर खरेदीपासून माघारी फिरले. पण त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळे एलॉन मस्क यांना ट्विटर खरेदी करणे भाग पडले. मस्क यांच्यावर या डीलबाबत अनेक आरोप करण्यात आले.

रात्रीची झोप उडाली एलॉन मस्क यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. त्यानुसार ही डील करताना आणि करार केल्यानंतर त्यांना अनेक दिवस झोप आली नाही. त्यांची रात्रीची झोप उडाली. त्यांनी ट्विटर खरेदीनंतर मोठे बदल केले. अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. काही कर्मचाऱ्यांनी भर मीटिंगमध्येच राजीनामा सत्र आरंभिले. एकावेळी ट्विटरमध्ये 8000 कर्मचारी काम करत होते. आता ट्विटरमध्ये 1500 कर्मचारी काम करत आहे.

हे सुद्धा वाचा

कोणाला विक्री करणार एलॉन मस्क यांनी ट्विटर कंटाळवाणा नसल्याचा दावा केला. पण ट्विटर आता फार काळ सोसण्यासारखे नसल्याचा साक्षात्कार मस्क यांना झाला. ट्विटर खरेदीपासून आपण बैचेन असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी ट्विटर खरेदीचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले. ट्विटर विक्री करण्याची योजना त्यांनी आखली आहे. योग्य व्यक्तीच्या हातात ट्विटर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्विटर योग्य व्यक्तीला विक्री करण्याचा दावा त्यांनी केला.

इतके मोजावे लागतात पैसा भारतात Twitter Blue सेवेसाठी युझर्सला 650 रुपये प्रति महिना शुल्क लागू करण्यात आले आहे. तर वेबवर ट्विटरचा वापर करणाऱ्यांना 650 रुपये दरमहा, तर मोबाईल युझर्सला मात्र जादा रक्कम मोजावी लागत आहे. त्यांना 900 रुपये प्रति महिना शुल्क द्यावे लागणार आहे.

एलॉन मस्कने ट्विटरसाठी नोंदणी शुल्क सुरु करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि जपान या देशांसह इतर देशात ट्विटर ब्लू सशुल्क सेवा सुरु केली होती. या देशामध्ये ब्लू टिकच्या नोंदणीसाठी 8 डॉलर प्रति महा शुल्क निश्चित करण्यात आले होते.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.