AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk ची स्टारलिंक सेवा डिसेंबर 2022 पासून भारतात सुरू, हायस्पीड इंटरनेट मिळणार

स्पेसएक्सच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड युनिटने डिसेंबर 2022 पासून सरकारी मंजुरीसह दोन लाख सक्रिय टर्मिनलसह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले. भारतातील स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर संजय भार्गव रविवारी म्हणाले, “मी ऑक्टोबरमध्ये खासदार, मंत्री, सचिवांशी 30 मिनिटांचे आभासी संभाषण करण्यास उत्सुक आहे.

Elon Musk ची स्टारलिंक सेवा डिसेंबर 2022 पासून भारतात सुरू, हायस्पीड इंटरनेट मिळणार
elon mask
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 7:13 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्टारलिंक ही उपग्रह कंपनी पुढील वर्षी डिसेंबरपासून भारतात ब्रॉडबँड सेवा सुरू करू शकते. इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी कंपनी देशातील दहा ग्रामीण लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करेल. ग्रामीण भागातील बदलत्या जीवनात ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे महत्त्व यासंदर्भात कंपनी संसद सदस्य, मंत्री आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करेल.

सरकारी मंजुरीसह दोन लाख सक्रिय टर्मिनलसह ब्रॉडबँड सेवा सुरू

स्पेसएक्सच्या सॅटेलाईट ब्रॉडबँड युनिटने डिसेंबर 2022 पासून सरकारी मंजुरीसह दोन लाख सक्रिय टर्मिनलसह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले. भारतातील स्टारलिंकचे कंट्री डायरेक्टर संजय भार्गव रविवारी म्हणाले, “मी ऑक्टोबरमध्ये खासदार, मंत्री, सचिवांशी 30 मिनिटांचे आभासी संभाषण करण्यास उत्सुक आहे. भारतात पाठवल्या जाणाऱ्या 80 टक्के स्टारलिंक टर्मिनल्ससाठी आम्ही कदाचित दहा ग्रामीण लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करू. ”

ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक

याआधी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतातील ऑर्डरची संख्या 500 च्या पुढे गेलीय आणि कंपनी ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक आहे. कंपनी ग्राहकांना $ 99 किंवा 7,350 रुपये प्रति ग्राहक आकारत आहे. कंपनीने ग्राहकांना 50 मेगाबिट ते 150 मेगाबिट प्रति सेकंद इंटरनेट स्पीड देण्याचे आश्वासन दिलेय.

केंद्र सरकार मंजुरी देणार?

गोव्यातील एका दुर्गम भागाने स्टारलिंक कंपनीने नेटवर्क उभारण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. अन्य भागांमध्ये 100 टक्के मागणी असल्यास स्टारलिंककडून त्याठिकाणी सेवा पुरवली जाईल. यापैकी बहुतांश इंटरनेट नेटवर्क स्थानिक प्रदात्यांच्या माध्यमातून पुरवले जाईल. परंतु ज्या भागात सेवा पुरवणे कठीण आहे तेथे स्टारलिंक सारखे सेटकॉम प्रदाते पुढाकार घेतील. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा भारतातील ग्रामीण भाग स्वतःला 100 % ब्रॉडबँड असल्याचे जाहीर करेल. स्टारलिंक आणि इतर ब्रॉडबँड प्रदात्यांसह काम करू इच्छिणारे राजकारणी आणि नोकरशहा माझ्याशी संपर्क साधू शकतात, असे संजय भार्गव यांनी सांगितले. प्री-ऑर्डर नोटमध्ये स्टारलिंकने म्हटले आहे की त्याची सेवा अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. भारताकडून मोठ्या प्रमाणात प्री-ऑर्डर मिळाल्यास त्याला सरकारी मान्यता मिळवणे सोपे होईल.

संबंधित बातम्या

अंबानी, अदानी आणि टाटा यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी NTPC चा मेगा प्लॅन

रेल्वेचे एसी भाडे पूर्वीपेक्षा स्वस्त होणार, रेल्वेने ‘या’ गाड्यांमध्ये 3 टियर इकॉनॉमी डबे बसवले, यादी पाहा

Elon Musk’s Starlink service launched in India from December 2022, will get high speed internet

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.