EPFO Update | नोकरदार वर्गासाठी ईपीएफओचा दिलासा, 31 डिसेंबरनंतरही करता येणार ई-नॉमिनेशन प्रक्रिया

ईपीएफओने देेशातील नोकरदार वर्गाला नवीन वर्षापूर्वी खूषखबर दिली. ई-नॉमिनेशनची प्रक्रिया करण्याची मुदत ईपीएफओने वाढवली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला वारसाचे नाव जोडणे शक्य होईल. पूर्वी ही मुदत 31 डिसेंबर 2021 अशी होती. 

EPFO Update | नोकरदार वर्गासाठी ईपीएफओचा दिलासा, 31 डिसेंबरनंतरही करता येणार ई-नॉमिनेशन प्रक्रिया
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 8:33 AM

मुंबई : ईपीएफओ (EPFO) खात्याशी वारसाला जोडण्याची अंतिम मुदत वाढवून ईपीएफओने दिलासा दिला. त्यामुळे जर तुम्ही अद्यापही तुमच्या वारसाचे नाव पीएफ अकाऊंटला जोडले नसेल तर त्वरीत ही प्रक्रिया पूर्ण करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास त्याचा तुम्हाला आणि कुटुंबियांना फायदा होईल. ही सुविधा सदस्य आणि त्याच्या कुटुंबियांसाठीच आहे. ई-नॉमिनेशन केल्यास वारसांना क्लेम करताना अडचणी येणार नाहीत. तसेच वारसाला 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षणही प्राप्त होईल.  पीएफ खातेधारकांना नामनिर्देशीत व्यक्तीचे नाव जोडण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPFO) पीएफ खातेधारकांना नॉमिनी एड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  31 डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती.

काय होऊ शकतो तोटा

EPFO नुसार, तुम्ही वारसदाराचे नाव जोडले नसेल तर पीएफ रक्कम खात्यात अडकू शकते खातेदाराने ई-नॉमिनेशन फॉर्म भरला नसेल तर खातेधारक पीएफ खात्यातून रक्कम काढू शकणार नाही. दावा दाखल करण्यापूर्वी ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास दाव्याचा ही निपटारा (Claim Settlement)  होणार नाही.

7 लाखांचे विमा कवच

EPFO सदस्यांना विम्याची सुरक्षा असते.  एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम( EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा मिळतो. या विमा योजनेत वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते. जर विना वारसदार पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, दाव्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. खातेधारकाने त्याची पत्नी, मुले, आई-वडिल यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ऑनलाईन पीएफ, निवृत्तीवेतन आणि विम्यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरणे अनिवार्य आहे.

या प्रक्रियेद्वारे जोडा  nominee

♦ ईपीएफओच्या www.epfindia.gov.in  या  संकेतस्थळाला भेट द्या

♦ त्यानंतर  ‘Service’ हा पर्याय निवडा

♦ पुढे  ‘For Employees’ या पर्यायवर क्लिक करा

♦ आता तुमचा UAN हा क्रमांक तयार ठेवा.  सॅलरी स्लीप (Salary Slip) वरही हा क्रमांक असतो.

♦ ‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ येथे क्लिक करुन तुम्ही लॉगिन करा

♦ नॉमिनी जोडण्यासाठी  ‘Manage’ पर्याय निवडा

♦ त्यात  ‘E-Nomination’ पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करा

♦ family declaration  या पर्यायावर या

♦ ‘Add Family Details’ संपूर्ण कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरा

♦ ‘Nomination Details’ हा कॉलम तर अधिक काळजीपूर्वक, अनुभवी व्यक्तीशी सल्ला घेऊन भरा

♦ ‘Save EPF Nomination’ हा पर्याय अंतिम टप्प्यातील आहे. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर हा पर्याय समोर येतो.

♦ ‘E-sign’ निवडीनंतर ओटीपी (OTP) येईल.

♦ हा ओटीपी आधार कार्डशी लिंक असेल.

♦ ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या नॉमिनीचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते.

इतर बातम्या :

नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ

अधिक चांगला परतावा पाहिजे?, तर नवीन वर्षात ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक

‘लिबोर’ पर्वाचा अस्त: कर्ज दर निश्चितीची नवी संरचना, स्टेट बँक बदलासाठी सज्ज

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.