दरवर्षी PF वरील व्याजाचा दर बदलतो, यंदा कधी आणि किती व्याज मिळणार? वाचा…

जर तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ कपात होत असेल तर तुम्हाला पीएफबाबत ही महत्त्वाची माहिती असायलाच हवी. पीएफविषयी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांना माहिती नाहीत.

दरवर्षी PF वरील व्याजाचा दर बदलतो, यंदा कधी आणि किती व्याज मिळणार? वाचा...
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 11:57 PM

नवी दिल्ली : जर तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ कपात होत असेल तर तुम्हाला पीएफबाबत ही महत्त्वाची माहिती असायलाच हवी. पीएफविषयी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांना माहिती नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे पीएफवर मिळणारं व्याज. पीएफच्या पैशांवर व्याज मिळतं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, हे व्याज दरवर्षी बदलतं हे तुम्हाला माहिती आहे का? सरकार दरवर्षी आपल्या पीएफवर किती व्याज द्यायचं याचा निर्णय घेत असते. त्यानंतर ही व्याजाची रक्कम पीएफ खातेधारकाला वर्ग केली जाते. त्यामुळेच यंदा पीएफवर किती व्याजदर मिळणार आणि कधी मिळणार हे माहिती करुन घेणं महत्त्वाचं आहे (EPFO is expected to credit 8.5 percent rate of interest know more details).

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने यंदा पीएफ खातेधारकांना (PF Account Holders) एक चांगली बातमी दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation-EPFO) आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफवर (EPF) 8.5 टक्के व्याज देणार आहे. आधी हे व्याज दोन टप्प्यात देण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता नव्याने होत असलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफवरील व्याज एकाच हप्त्यात मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटमधील वाढत्या तेजीमुळे ईपीएफओ (EPFO) आता डिसेंबरमध्ये आपली इक्विटी होल्डिंग विकून अधिक परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 19 कोटी ईपीएफ खात्यात 8.5 % व्याज देण्यात येणार आहे. (epfo entire interest to be credited into around 19 crore epf accounts)

बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने (Union labour and employment ministry) 19 कोटी ईपीएफ खात्यांमध्ये 8.5 टक्के व्याज एकरकमी देण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे. मंत्रालयाच्या या शिफारशीवर वित्त मंत्रालयाकडून अद्याप कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. पण या आठवड्याभरात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

व्याज कधी मिळणार?

खरंतर, याआधी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) ने कोविडमुळे बाजार घसरल्यामुळे सेवानिवृत्ती फंड आपली इक्विटी गुंतवणूकी कमी करू शकत नसल्याने पहिल्यांदाच ईपीएफओ दोन हप्त्यांमध्ये व्याज जमा करणार अशी घोषणा केली होती. यावेळी ईपीएफओने 8.15 टक्के व्याज (कर्ज गुंतवणूकीतून मिळविलेले नफा) ताबडतोब जमा केलं जावं असं ठरवण्यात आलं होतं. तसेच 0.35 टक्के व्याज दुसऱ्या टप्प्यात देणार होते. मात्र, आता हे सर्व व्याज एकरकमी मिळणार आहे. या महिन्यातच हे व्याज कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

थेंबे थेंबे तळे साचे, मुलांच्या नावे दररोज 166 रुपयांची गुंतवणूक, 15 वर्षांत बक्कळ रक्कम

PPF | मुलांच्या नावे पीपीएफमध्ये महिन्याला हजार रुपये गुंतवा, 15 वर्षांत मोठा फंड जमवा

Bank ATM Rules | एटीएम ते मिनिमम बॅलन्स, बँकिंग नियम पूर्वपदावर, ‘हे’ दहा बदल

EPFO is expected to credit 8.5 percent rate of interest know more details

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.