Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता; रिटायर्टमेंटला मिळवा बक्कळ पैसा, EPFO पेन्शनमध्ये आली ही सुविधा, फायदाच फायदा

EPFO Pension Retirement : EPFO पेन्शन संदर्भातील काही नियमात मोठा बदल होण्याची तयारी होत आहे. या बदलामुळे कर्मचारी पेन्शनसाठी जास्त योगदान, अंशदान करता येईल. त्यामुळे सेवा निवृत्तीवेळी कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन मिळेल. अर्थात कंपनी जास्त योगदान देणार नाही, हे स्पष्ट आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता; रिटायर्टमेंटला मिळवा बक्कळ पैसा, EPFO पेन्शनमध्ये आली ही सुविधा, फायदाच फायदा
ईपीएफओ पेन्शन
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 1:43 PM

कामगार आणि रोजगार मंत्रालय, कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनातंर्गत (EPFO) कर्मचारी निवृत्ती योजनेत (Employees Pension Scheme) मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यातंर्गत ईपीएफओमध्ये जास्त पेन्शन योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सवलत देण्याचा विचार करण्यत येत आहे. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की याविषयी विचार सुरू आहे. जास्त पेन्शन योगदान, जास्त सवलत अशा फॉर्म्युल्यावर विचार सुरू आहे. जर आता कर्मचाऱ्याने या योजनेत अधिक बचत केली तर त्याला निवृत्तीवेळी अधिक फायदा होईल. त्याला मोठी रक्कम मिळेल.

आता किती योगदान?

आता 15000 रुपयांच्या मूळ वेतनावर EPFO मध्ये 12-12 टक्क्यांचे योगदान कर्मचारी आणि मालकाला द्यावे लागते. कंपनीच्या योगदानातील 8.33 टक्के वाटा हा कर्मचारी निवृत्ती योजनेत जमा होतो. तर कर्मचाऱ्याचे संपूर्ण 12 टक्के योगदान हे EPF खात्यात जमा होते. सध्या कंपनीकडून योगदानात वाढ करण्याचा कोणताही विचार आलेला नाही. पण कर्मचाऱ्यांना ईपीएसमध्ये अधिक योगदान करण्याची संधी नक्की मिळेल.

हे सुद्धा वाचा

निष्क्रिय PF खात्यात 8505 कोटी

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये निष्क्रिय पीएफ खात्यातील जमा रक्कम 2018-19 च्या पेक्षा पाच पट अधिक आहे. ती आता 8,505.23 कोटी रुपये इतकी झाली आहे. ही माहिती काही दिवसांपूर्वी लोकसभेत देण्यात आली. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये ही रक्कम 1,638.37 कोटी रुपये होती. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगीतले की, ईपीएफ योजनेत कोणतेही विना दावा खाते नाही.

सप्टेंबर महिन्यात 19 लाख कर्मचारी

EPFO मध्ये सप्टेंबर महिन्यात संघटित क्षेत्रातील 18 लाख 81 हजार कर्मचारी जोडल्या गेले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आकड्यांनुसार, गेल्यावर्षांपेक्षा ही संख्या 9.33% अधिक आहे. EPFO मध्ये सप्टेंबर महिन्यात एकूण कर्मचाऱ्यांमध्ये नवीन जोडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 9 लाख 47 हजार इतकी आहे.

पेन्शनसाठी 10 वर्षांची नोकरी आवश्यक

EPFO च्या नियमानुसार, पेन्शन प्राप्तीसाठी कर्मचाऱ्याने सलग 10 वर्षे नोकरी करणे आवश्यक आहे. जो कर्मचारी या व्याखेत बसतो, 50 वर्षांपेक्षा वयाने अधिक असतो त्याला पेन्शन मिळण्याचा अधिकार मिळतो. जर नोकरी करण्याचा कालावधी 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर निवृत्ती वेतनाची जमा रक्कम कर्मचारी केव्हाही काढू शकतो.

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.