निवृत होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारकडून नियमात मोठा बदल
तुम्ही लवकरच निवृत्त होणार आहात? मग तुमच्याही अत्यंत महत्त्वाची अपडेट! निवृत्त होणाऱ्यांनो ही बातमी वाचाच
नवी दिल्ली : सरकारने (Centre Govenrment Employee News) एक दिलासादायक निर्णय घेत असंख्य केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबतच्या एका महत्त्वाच्या नियमात बदल केलाय. हा बदल पीएफशी (EPFO News) संबंधीत आहे. रिटायरमेन्ट बॉडी फंडने 6 महिन्यापेक्षा कमी काळात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, निवृत्त (Retire Employee Pension) होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ योजना 1995 नुसार लाभ दिला जाणार आहे. तसा निर्णयही सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्तीच्या आधी सहा महिन्यांच्या काळात कधीही पीएफचे पैसे काढता येऊ शकणार आहेत.
सीबीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या वतीने एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव अखेर केंद्र सरकारने बैठकीत मान्य केला. त्यामुळे असंख्य निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सीबीटीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या ईपीएश खात्यातून पैसे काढता येणं शक्य होणार आहे.
देशात ईपीएफचा लाभ घेणारे 6 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. ही संख्या येत्या काळात आणखी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावे, यासाठीही धोरणात्मक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं.
सोमवारी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत ईपीएस-95 योजनेतील बदलांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले.
232nd meeting of Central Board of Trustees, Employees’ Provident Fund is being organised on 31st October, 2022 in New Delhi. #EPFO #SocialSecurity #AmritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/CI9ty8v5eo
— EPFO (@socialepfo) October 31, 2022
दरम्यान, सीबीटीने याव्यतिरीक्तही अन्य काही प्रस्तावही या बैठकीत मांडले. 34 वर्षांपेक्षा जास्त काळ पीएफशी संबंधित असणाऱ्यांना वाढीव पेन्शल मिळावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. निवृत्ती वेतनाच्या गुणोत्तरात पीएफचे लाभही दिले जावेत, असं सीबीटीने बैठकीत सुचवलं.
दरम्यान, याआधी निवृत्तीवेळीच पीएफचे पैसे काढले जात होते. मात्र आता निवृत्तीच्या सहा महिने आधीच सुद्ध निवृत्तीचे पैसे काढता येऊ शकणार असल्यानं अनेकांना दिलासा मिळालाय.