20 वर्षांपूर्वी या भारतीयने केलं होतं जगातील महागडं लग्न; गिनीज बुकमध्ये आहे रेकॉर्ड

Most Expensive Wedding In World : सध्या अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे. देशात या लग्नावरील वारेमाप खर्चाची चर्चा करत आहे. तर काही जण या ग्रँड लग्नाची खबरबात ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. पण यापूर्वी देशात कोणाचं महागडं लग्न लागलं होतं, माहिती आहे का?

20 वर्षांपूर्वी या भारतीयने केलं होतं जगातील महागडं लग्न; गिनीज बुकमध्ये आहे रेकॉर्ड
जगातील सर्वात महागडं लग्न
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 4:18 PM

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहाची सध्या चर्चा रंगली आहे. आज हे लग्न होत आहे. त्यासाठी बॉलिवूड आणि हॉलिवूड सहित अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. या लग्नाविषयीचे अनेक कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. सध्या या लग्नाच्या खर्चाची चर्चा सुरु आहे. तर अनेकांना या ग्रँड लग्नाची खबरबात माहिती करुन घ्यायची आहे. पण जगातील सर्वात महागडं लग्न कोणतं आहे, तुम्हाला माहिती आहे का? एका भारतीयाच्या नावे हे महागडं लग्न आहे. या शाही विवाहाची नोंद गिनीज बुकमध्ये पण करण्यात आली आहे.

या लग्नाची जगभर चर्चा

जगातील अनेक लग्न हे महागडे असल्याचा दावा करण्यात येतो. प्रिंस चार्ल्स आणि डायना यांच्या शाही विवाहाची चर्चा रंगली होती. या लग्नासाठी 110 दशलक्ष डॉलर खर्च आल्याचा दावा करण्यात येतो. याशिवाय रशियातील Said Gutseriev आणि Khadija Uzhakhovs यांच्या लग्नाला पण महागड्या विवाहाचा टॅग लागला होता. इतर पम अनेक लग्न शाही असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या लग्नाच्या खर्चाची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण जगातील सर्वात महागडं लग्न कोणते झाले तुम्हाला माहिती आहे का?

हे सुद्धा वाचा

गिनीज बुकात झाली नोंद

देशातील एका महागड्या लग्नाची 20 वर्षांपूर्वी अशीच चर्चा झाली होती. त्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. एका भारतीयाने जगातील सर्वात महागडे लग्न केले होते. जगातील सर्वात महागड्या लग्नाचा रेकॉर्ड हा स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल यांची मुलगी वनिषा मित्तल हिच्या नावावर आहे. वनिषा मित्तल हिने 2004 मध्ये बँकर अमित भाटिया सोबत लग्न केले होते. हे लग्न भारतात नाही तर फ्रान्समध्ये झाले होते.

किती झाला होता खर्च

गिनीज बुकीनुसार, लक्ष्मी निवास मित्तल यांची मुलीचा विवाह सोहळा हा Versailles मध्ये 6 दिवस चालला होता. या लग्नाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हा सोहळा Versailles च्या राजवाड्यात झाला होता. या राजवाड्यात हा एकमेव खासगी सोहळा झाला होता. या लग्नात परदेशी पाहुण्यांची आणि बॉलिवूडमधील स्टारची रेलचेल होती. या लग्नात 55 दशलक्ष डॉलर खर्च झाले होते. भारतीय चलनात या लग्नासाठी 450 कोटी रुपये खर्च आला होता.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....