Gold Silver Price Today : सोने-चांदी अजूनही मावळतीलाच! चला मग खरेदीला

Gold Silver Price Today : सोने-चांदीने ग्राहकांना सकाळच्या सत्रात दिलासा दिला आहे. आज ही भावात मोठा उलटफेर झालेला नाही.जाणून घेऊयात आजचा भाव..

Gold Silver Price Today : सोने-चांदी अजूनही मावळतीलाच! चला मग खरेदीला
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 9:18 AM

नवी दिल्ली : सोन्याचे भाव धपकन आपटले नसले तरी त्यात मोठी घसरण झाली हे मात्र नक्की. ऐन अक्षय तृतीयेच्या एक आठवड्यापूर्वी सोन्यातील तेजीचे सत्र हरवले. चांदीतही मोठी घसरण झाली. पण अनेक तज्ज्ञांच्या मते, देशातील बाजारपेठेत सोने आणि चांदीला (Gold And Silver Price) हवी तशी मागणी आली नाही. वाढलेल्या किंमतींचा हा परिणाम आहे. गेल्या सहा महिन्यात सोन्यात जवळपास 11 हजारांची वाढ झाली तर चांदीच्या किंमतीही झरझर वधारल्या. 2 फेब्रुवारी 2023 आणि 5 एप्रिल 2023 रोजी सोने-चांदीने किंमतींच्या भाऊगर्दीत नवीन रेकॉर्ड गाठला. दोन्ही दिवशी या दोन्ही धातूंनी भविष्यातील आगेकूच अधोरेखित केली. पण गेल्या दहा दिवसांपासून किंमतीत मोठी वाढ झालेली नाही, हाच ग्राहकांना सध्याचा दिलासा आहे.

हजार रुपयांची तफावत गेल्या आठवड्यात 14 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 56,800 रुपये प्रति तोळा विक्री झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,000 रुपयांना अगदी 50 रुपये कमी होता. मध्यंतरीच्या दहा दिवसांत सोन्याला 19 एप्रिल रोजी 200 रुपयांची चढाई करता आली. इतर दिवशी सोन्याच्या किंमतीत पडझड सुरु होती. 25 एप्रिल रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 55,840 रुपये तर 60,850 रुपये प्रति तोळा होता. एका आठवड्यात भावात एक हजारांची घसरण झाली.

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 25 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 90 रुपयांची दरवाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,840 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 10 रुपयांनी घसरुन 60,850 रुपये प्रति तोळ्यावर आला.

हे सुद्धा वाचा

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

अशी तपासा शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.