Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 मार्चला फेडरल रिझर्व्हचा महत्त्वाचा निर्णय, बाजारावर दिसणार मोठा परिणाम

पुढचा आठवडा शेअर बाजारासाठी (Share market) खूप महत्त्वाचा असणार आहे. विशेष म्हणजे होळी शुक्रवारी असल्याने शेअर मार्केट दिवसभर बंद राहणार आहे.

16 मार्चला फेडरल रिझर्व्हचा महत्त्वाचा निर्णय, बाजारावर दिसणार मोठा परिणाम
शेअर बाजाराचे ताजे अपडेट्स..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 2:34 PM

पुढचा आठवडा शेअर बाजारासाठी (Share market) खूप महत्त्वाचा असणार आहे. विशेष म्हणजे होळी शुक्रवारी असल्याने शेअर मार्केट दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात फक्त चार दिवस मार्केट सुरू राहिल. 15 मार्च रोजी अमेरिका फेडरल रिझर्व्हची (america federal reserves) एक महत्त्वाची बैठक होणार असून त्यात हितसंबंधांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच झालेल्या बैठकीचे निर्णय 16 मार्च रोजी जाहीर केले जातील. फेडरल रिझर्व्ह व्याज वाढवण्याची अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेन (russai ukraine) संघर्ष, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा व्याजदराचा निर्णय आणि देशांतर्गत चलनवाढीची आकडेवारी या आठवडय़ात शेअर बाजारांची दिशा ठरवेल, असे शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पुढचा आठवडा अनेकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बाजारावर नेमका काय परिणाम होणार हे सुध्दा पाहावं लागेल.

रशिया-युक्रेन तणावाबाबत अजूनही अनिश्चितता आहे

रशिया-युक्रेन तणावाबाबत अजूनही अनिश्चितता आहे, फेडरल ओपन मार्केट कमिटी बैठक, रशिया-युक्रेन संघर्ष हे या आठवड्यात बाजारासाठी महत्त्वाचे जागतिक घटक असतील असं स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले आहे. झालेल्या बैठकीचे निर्णय हे दुस-या दिवशी जाहीर होतील. कच्च्या तेलाच्या किमती आणि विदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन भारतीय बाजारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे सुध्दा स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले.

16 मार्चच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष

रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्चचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, “कमी ट्रेडिंग सत्रांसह हा आठवडा असेल. सोमवारी औद्योगिक उत्पादन (IIP) डेटावर बाजारातील सहभागी प्रतिक्रिया देतील. त्याचप्रमाणे ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईची आकडेवारीही येणार आहे. यूएस मध्यवर्ती बँकेच्या बैठकीचे निकाल 16 मार्च रोजी जाहीर होतील. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील असं रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्चचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले आहे.

बाजार अस्थिर राहण्याची शक्यता

भारतात पाच राज्यात झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच महत्त्वाच्या घटकांवर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, हे सर्व व्यवस्थित होईपर्यंत बाजार अस्थिर राहण्याची शक्यता मोतीलाल ओसवाल फायनाान्शियल सर्व्हिसेसचे रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी व्यक्त केली.

निवृत्ती योजनेत गुंतवणुकीला प्राधान्य, एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांची वाढ

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

आर्थिक अडचणीमध्ये गुंतवणुकीवर कर्ज घेणे कितपत फायदेशीर?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.