31 मार्चपर्यंत ‘ही’ कामं काहीही करून पूर्ण करा, नाहीतर होईल आर्थिक नुकसान
31 मार्च ही तारीख आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार घडतात. यामुळे हा महिना संपण्याच्या आत तुमची सगळी महत्त्वाची कामं आवरून घ्या.

देशातील तिसर्या क्रमांकाची सरकारी बँक Bank of Baroda ग्राहकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत (पीएमजेजेबीवाय) दररोज दोन लाख रुपयांचा विमा देत आहे. ही एक मुदत विमा योजना आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत (पीएमजेजेबीवाय) गुंतवणूक करून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात.
- आर्थिक वर्ष 2020-21 लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत काही अशी कामे आहेत जी 31 मार्चपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत. जर आपण ही कामे दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण केली नाहीत तर भारी दंड भरावा लागणार आहे. करासंबंधी काही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे.
- अशात, 31 मार्च 2021 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला जोडले जाणे आवश्यक आहे. आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. तसेच आधारला पॅन कार्ड जोडलेले नसले आणि तरीही त्याचा कुठे उपयोग केल्यास दंडसुद्धा होऊ शकतो. हा दंड 10 हजार रुपये इतका असू शकतो.
- पॅन-आधार लिंक करण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2021 रोजी निश्चित केली. आतापर्यंत ज्यांनी पॅनला आधारशी जोडले नाहीये, त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे. पॅन कार्ड आधारशी जोडले नाही तर ते निष्क्रिय होते. निष्क्रिय पॅन वापरल्याबद्दल प्राप्तिकर कलम 272B अंतर्गत 10000 रुपये दंड आकारला आहे. प्राप्तिकर विभागाने यासाठी यापूर्वीच अधिसूचना जारी केलीय.
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Highways) कोरोना साथीच्या कारणास्तव वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयूसीला 1 फेब्रुवारी नंतर 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळे तुम्ही आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचे आवश्यक कागदपत्र नूतनीकरण न केल्यास 31 मार्चनंतर तुमच्याकडून दंड आकारला जाईल. म्हणून लवकरच सर्व कागदपत्रांचे नूतनीकरण करून घ्या.
- करदात्यांना मोठा दिलासा, आयटीआर भरण्यासाठी एक महिना मुदतवाढ