पीएफ ग्राहकांसाठी UAN क्रमांक आवश्यक, घरबसल्या कसा मिळवाल, जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी करते. UAN वापरून तुम्ही तुमचे EPF खाते ट्रॅक करू शकता, तुमचे पासबुक ऑनलाईन पाहू शकता. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ खाते असल्यास तुम्ही UAN वापरून तुमच्या सर्व पीएफ खात्यांचे तपशील एकाच ठिकाणी पाहू शकता.

पीएफ ग्राहकांसाठी UAN क्रमांक आवश्यक, घरबसल्या कसा मिळवाल, जाणून घ्या
ईपीएफओ
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 7:22 AM

नवी दिल्लीः How to get UAN Online: जर तुम्ही नोकरी करत असाल आणि EPFO ​​चे सदस्य असाल तर UAN नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) जारी करते. UAN वापरून तुम्ही तुमचे EPF खाते ट्रॅक करू शकता, तुमचे पासबुक ऑनलाईन पाहू शकता. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ खाते असल्यास तुम्ही UAN वापरून तुमच्या सर्व पीएफ खात्यांचे तपशील एकाच ठिकाणी पाहू शकता. तुम्ही तुमचा UAN नंबर घरबसल्या ऑनलाईन जाणून घेऊ शकता.

UAN स्टेटस कसे तपासायचे?

सर्व प्रथम EPFO ​​च्या वेबसाईटवर जा, यासाठी तुम्हाला या लिंकवर जावे लागेल- epfindia.gov.in. त्यानंतर Our Services या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सदस्य UAN/ ऑनलाईन सेवा (OCS/ OTCP) वर जा. आता Know Your UAN Status वर क्लिक करा.

UAN नंबर कसा मिळवायचा?

यासाठी सर्वप्रथम तुमचा सदस्य आयडी किंवा आधार क्रमांक किंवा पॅन टाका. त्यानंतर तुमचा तपशील जसे की नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी द्या. त्यानंतर कॅप्चा टाका आणि Get Authorization Pin वर क्लिक करा. या टप्प्यांचे अनुसरण केल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक एसएमएसद्वारे पाठविला जाणार आहे.

तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. वयाच्या 55 ​​वर्षांनंतर तुम्ही निवृत्तीनंतर पैसे काढू शकता. याशिवाय निवृत्तीपूर्वीही अनेक कारणांसाठी तुम्ही तुमच्या EPF खात्यातून पैसे काढू शकता. तुम्ही घर खरेदी किंवा बांधकाम, मुलाचे लग्न आणि शिक्षण आणि कोरोना व्हायरसच्या काळात कोणत्याही आर्थिक आणीबाणीसाठी पैसे काढू शकता. तुम्ही घरी बसून पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

स्मार्टफोनवर पीएफ खात्याचे तपशील देखील पाहू शकता

तसेच तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर पीएफ खात्याचे तपशील देखील पाहू शकता. हे उमंग (युनिफाइड मोबाईल अॅप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स) अॅपवर तपासले जाऊ शकते. हे अॅप भारत सरकारचे असून, ते अँड्रॉइडवरील गुगल प्ले स्टोअर आणि आयफोनवरील अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. या अॅपद्वारे ईपीएफ सदस्यांना पासबुक पाहणे, पीएफसाठी दावा करणे इत्यादी विविध सुविधा मिळू शकतात.

संबंधित बातम्या

Gold Silver Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, वाचा ताजे दर

सॉवरेन गोल्ड बाँडची नवी योजना सुरू, सोने खरेदीसाठी याहून चांगला ‘मुहूर्त’ नाही, हे आहे कारण

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.