Nirmala Sitharaman : लघु उद्योगांना 3 लाखांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार – अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. (FM Nirmala Sitharaman Press Conference Live Update)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा (Atmnirbhar Bharat Abhiyan Package) नारा दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज जाहीर केलं. 20 लाख कोटी रुपयाचं हे पॅकेज (20 Lakh Crore Package) आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (13 मे) पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची सविस्तर माहिती दिली (FM Nirmala Sitharaman Press Conference Live Update).
15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य, मोदी सरकारचा दिलासा https://t.co/OS2KYXJcOr #NirmalaSitharaman #PF #EPFO
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2020
Nirmala Sitharaman LIVE Update :
- 15 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ऑगस्टपर्यंत ईपीएफ देईल. मालक आणि कर्मचारी या दोघांना मदत करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. यासाठी सुमारे 2,500 कोटी रुपयांचा खर्च येईल – अर्थमंत्री
- मत्स्यव्यवसाय विभाग, कृषी सिंचन योजना, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या व्यवहारात सुधारणा केली जाणार, FDI वरील नियमांत शिथिलता, GST मध्ये सुधारणा करण्यात येणार : अर्थमंत्री
- एक कोटीची गुंतवणूक असलेल्या कंपन्या मायक्रो युनिट असतील. व्यवसाय अधिक असला तरीही एमएमएमईला त्याचा फायदा होत राहील. सर्व प्रकारच्या क्षेत्रात गुंतलेल्या एमएसएमईंना या योजनेचा फायदा होईल – अर्थमंत्री
Unfair competetion from foreign companies to become a thing of the past; Global tenders to be disallowed in Government procurement upto Rs 200 crores#AatmaNirbharBharatAbhiyan #atmanirbharbharat pic.twitter.com/voj3hstdOR
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) May 13, 2020
- MSME जी सक्षम आहेत, परंतु कोरोनामुळे संकटात सापडली आहे, त्यांना व्यवसायाच्या विस्तारासाठी 10 हजार कोटींच्या फंड्स ऑफ फंडच्या माध्यमातून मदत केली जाईल – अर्थमंत्री
- To provide stressed MSMEs with equity support, Government will facilitate provision of Rs. 20,000 cr as subordinate debt. #AatmaNirbharBharatAbhiyan pic.twitter.com/zNxbJUawiK
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) May 13, 2020
- संकटात सापडलेल्या MSME साठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे – अर्थमंत्री
- MSME ला 3 लाख कोटी विना हमी कर्ज मिळणार : अर्थमंत्री
- पगाराच्या 24 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाणार, 15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकारकडून दिलासा : अर्थमंत्री
- मध्यम, लघूद्योग आणि कुटीर उद्योगांसाठी विशेष योजना, या सर्वांना 3 लाख कोटींचं विनातारण कर्ज मिळणार, एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही : अर्थमंत्री
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम, कुटीर, गृह उद्योगांसाठी तीन लाख कोटी रुपयांचे Collateral-free Automatic (हमीमुक्त) कर्ज, चार वर्षांची मुदत : अर्थमंत्री
- जनधन खात्यातंर्गत पैसे देण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले : अर्थमंत्री
- रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही धान्य मिळणार, ७१ हजार मेट्रीक टन डाळीचं वाटप करण्यात आलं : अर्थमंत्री
- कृषी क्षेत्रात सुधारणा केली, आवाज योजना, उज्वला योजनाने फायदा करुन दिली, आयुष्मान योजनेने गरिबांना उपचारात मदत केली, देशात व्यवसाय करण्यात मदत झाली – अर्थमंत्री
-
Nirmala Sitharaman LIVE | स्वदेशी ब्रॅण्डसा जगासमोर ओळख मिळवून द्यायची आहे, देशात पीपई, व्हेंटिलेटरचं उत्पादन होत आहे, लोकांच्या खात्यात थेट मदत पोहोचवली जात आहे – अर्थमंत्री –https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/2Km1u9XehY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2020
स्वदेशी ब्रॅण्डना जगासमोर ओळख मिळवून द्यायची आहे, देशात पीपई किट, व्हेंटिलेटरचं उत्पादन होत आहे, लोकांच्या खात्यात थेट मदत पोहोचवली जात आहे – अर्थमंत्री
- पंतप्रधानांनी देशासमोर आपला विचार ठेवला, या पॅकेजवर अनेक मंत्रालयांशी चर्चा झाली, या पॅकेजच्या आधारे देशाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न असेल – अर्थमंत्री
- ‘आत्मनिर्भर’चा नेमका अर्थ काय? निर्मला सीतारमन यांनी चार दाक्षिणात्य भाषेत समजावला
20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज
कोरोना संकंटाचा सामना करताना नव्या संकल्पानुसार पंतप्रधान मोदी यांनी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारताचा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं असेल, असे काल मोदींनी जनतेशी संवाद साधताना म्हणाले.
नुकतंच सरकारने कोरोना संकंटाशी संबंधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या, जे रिझर्व्ह बँकेचे निर्णय होते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा होत आहे त्याला जोडलं तर हे पॅकेज जवळपास 20 लाख कोटींचं पॅकेज आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के एवढे आहे. देशाच्या विविध वर्गांना यामार्फत आर्थिक सहकार्य मिळेल. 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये स्वावलंबी भारतच्या अभियानाला एक वेगळी गती देईल. स्वावलंबी भारतच्या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. हे पॅकेज कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग अशा अनेकांसाठी आहे.
देशातील नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी आणि श्रमिक मजुरांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. हे आर्थिक पॅकेज प्रामाणिकपणे टॅक्स भरुन देशाच्या विकासात आपलं योगदान देणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी आहे. गेल्या सहा महिन्यात व्यवस्था सक्षम झाली. त्यामुळेच भारताच्या प्रत्येक गरिबापर्यंत केंद्र सरकारची आर्थिक मदत पोहोचली.
(FM Nirmala Sitharaman Press Conference Live Update)
संबंधित बातम्या :
self reliance India : पराभव मंजूर नाही, स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज : मोदी
Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार