Budget : पुढील बजेटमध्ये जनतेसाठी खास भेट, अर्थमंत्री म्हणाल्या हे बदल होतील थेट..

Budget : पुढील बजेटसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी डिसेंबर महिन्यापासूनच अर्थसंकल्पाची तयारी सुरु करण्यात येणार आहे.

Budget : पुढील बजेटमध्ये जनतेसाठी खास भेट, अर्थमंत्री म्हणाल्या हे बदल होतील थेट..
सरकार बजेटमध्ये देणार ही भेटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 4:43 PM

नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाची (Budget) चर्चा आतापासूनच रंगात आली आहे. कारण ही तसचं आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) आता जागतिक मंचावरच अर्थसंकल्पाची रुपरेषा कशी असेल याचा उलगडा केला आहे. पुढील बजेटसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कंबर कसली आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी डिसेंबर (December) महिन्यापासूनच अर्थसंकल्पाची तयारी सुरु करण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत(Budget 2023) मोठी घोषणा केली आहे. पुढील अर्थसंकल्पासाठी आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे. मंदीचा परिणाम बघता केंद्र सरकारने विकास दर कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होईल.

केंद्रीय अर्थमंत्री सध्या अमेरिकेत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी त्या वॉशिंग्टन येथे पोहचल्या आहेत. अर्थतज्ज्ञ ईश्वर प्रसाद यांच्यासोबत सीतारमण यांनी अर्थसंकल्पाविषयी चर्चा केली.

हे सुद्धा वाचा

पुढील अर्थसंकल्पाविषयी सर्वच सांगणे अवघड असल्याचे स्पष्ट करत, अर्थमंत्र्यांनी या बजेटचा उद्देश काय असेल यावर प्रकाश टाकला. आर्थिक वृद्धीत सातत्य ठेवणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

महागाईच्या आघाडीवर सरकार उपाय योजना करणार आहे. महागाई कमी करणे आवश्यक असल्याचे सांगत सरकार त्यावर काम करत असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला आहे. सीतारमण यांनी महागाईवर चिंता दाखवत, ती कमी करण्यासाठी खास प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील अर्थसंकल्पासाठी डिसेंबर महिन्यातच तयारी करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये लोकसभेत बजेट सादर करण्यात येईल. विकासाची गती कायम ठेवण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विशेष योजनाही राबविण्यात येणार आहे.

कोरोना महामारीनंतर देशाची स्थिती अधिक मजबूत करणे, खाद्यपदार्थाच्या किंमती, अन्नधान्याच्या किंमती कमी करणे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.