Liqour Price : या राज्यातील तळीरामांची चंगळ! इतकी स्वस्त मिळते Liqour

Liqour Price : मद्यप्रेमींसाठी हे राज्य स्वर्गाहून कमी नाही. कारण या राज्यात सर्वात स्वस्त दारु विक्री होते. या ठिकाणी दारुवरील कर कमी आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार दारु ही आरोग्यासाठी हानीकारक असल्याच्या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करत असली तरी दारुचा महापूर काही थांबायला तयार नाही.

Liqour Price : या राज्यातील तळीरामांची चंगळ! इतकी स्वस्त मिळते Liqour
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 7:45 PM

नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : देशातील प्रत्येक राज्यात दारुचा वेगवेगळा भाव (Liquor Rate) आहे. काही राज्यात दारु इतर राज्यांपेक्षा स्वस्त मिळते. राज्यांच्या सीमांवर तर दारुच्या तस्करींच्या घटना थांबविण्यासाठी पोलिसांना अधिक मेहनत घ्यावी लागते. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार दारुबंदीसाठी कोट्यवधींचा चुराडा करत असली तरी दारुतूनच सर्वाधिक महसूल त्यांना मिळतो. पण काही राज्यांमध्ये कर कमी असल्याने, दारुच्या किंमती कमी आहेत. इतर राज्यांपेक्षा या राज्यात दारु स्वस्त (Cheapest Liquor) मिळते. म्हणजे एखाद्या राज्यात दारुची किंमत 100 रुपये असेल तर दुसऱ्या राज्यात जवळपास 300 ते 500 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे येथील तळीरामांची सर्वाधिक चंगळ आहे. ही राज्यं त्यांच्यासाठी जणून स्वर्गच आहेत.

या राज्यात नाही स्वस्त

अनेक लोकांचा गैरसमज आहे की, दिल्लीसह हरियाणा राज्यात सर्वात स्वस्त दारु मिळते. काहींना तर पंजाब राज्यात पण स्वस्तात दारु मिळते, असा समज आहे. पण सर्वात स्वस्त शराब गोवा राज्यात मिळते. तर महागडी दारु या राज्यांमध्ये मिळते. ‘इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने याविषयीचा अभ्यास केला. त्यातून ही आकडेवारी समोर आली.

हे सुद्धा वाचा

गोव्यात दारुवर 49% कर

गोव्यात दारुच्या मुळ किंमतीवर 49% कर लागतो. हा कर फार मोठा वाटत असला तरी इतर राज्यांपेक्षा तो कमी आहे. त्यामुळे गोव्यात दारु स्वस्त मिळते. इतर राज्यात कर अधिक असल्याने दारु चढ्या दराने खरेदी करावी लागते. त्यामुळेच अनेक पर्यटकांचा ओढा गोव्याकडे असतो. गोव्यात दारु स्वस्त मिळत असली तरी तुम्हाला तुमच्या राज्यात घेऊन येता येत नाही. गोव्याच्या सीमेजवळील गावकरी मात्र दारुसाठी गोव्यात आणि जेवणासाठी त्यांच्या राज्यात येतात. त्यांच्यासाठी दारु कोल्ड्रिंकच्या किंमतीत दारु मिळते. हरियाणात गोव्यापेक्षा दारुवर कमी कर लागतो. या राज्यात दारुवर केवळ 47 टक्के कर आहे. तर दिल्लीत 62 टक्के कर आकारल्या जातो.

कर्नाटकमध्ये सर्वात महागडी दारु

देशात सर्वात महागडी दारु कर्नाटक राज्यात मिळते. या राज्यात सर्वाधिक कर आकरल्या जातो. 83% कर आकारल्या जातो. गोव्यात 100 रुपये किंमतीची दारु कर्नाटक राज्यात 500 रुपयांपेक्षा अधिक किंमतींना मिळते. तर दिल्लीत हीच बाटली 134 रुपये तर हरियाणात 147 रुपयांना मिळते. महाराष्ट्रात दारुच्या बाटलीवर 71 टक्के कर लागतो. महाराष्ट्रात 226 रुपये, तर तेलंगाणात 246 रुपयांनी ही बाटली मिळते.

गोव्यात 100 रुपयांची दारु 8 राज्यांमध्ये या किंमतीला विक्री होते

  1. दिल्ली – 134 रुपये
  2. हरियाणा – 147 रुपये
  3. उत्तर प्रदेश – 197 रुपये
  4. राजस्थान – 213 रुपये
  5. महाराष्ट्र – 226 रुपये
  6. तेलंगाणा – 246 रुपये
  7. कर्नाटक – 513 रुपये
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.