FPI : परदेशी गुंतवणूकदारांचा यू-टर्न भोवला, इतके हजार कोटी रुपये घेतले काढून, भारतीयांनी तारला शेअर बाजार

FPI : परेदशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराला हात दाखवला.

FPI : परदेशी गुंतवणूकदारांचा यू-टर्न भोवला, इतके हजार कोटी रुपये घेतले काढून, भारतीयांनी तारला शेअर बाजार
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 7:35 PM

नवी दिल्ली : परदेशी गुंतवणूकदारांची (Foreign Investors) भीतीने गाळण उडाल्याने त्यांनी भारतीय शेअर बाजारातून (Share Market) पलायन केले. सध्या चीनसह जगातील काही देशांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. तर अमेरिकन बाजाराला मंदीचा धोका सतावत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे धास्तावलेल्या परदेशी पाहुण्यांनी लागोलाग बाजारातून पलायन सुरु केले. त्यांनी गुंतवणूक काढून घेतली. अर्थात शेअर बाजाराला त्याचा फटका बसला. पण भारतीय गुंतवणूकदारांनी (Indian Investors) बाजाराचे पानीपत होऊ दिले नाही. त्यांनी बाजाराला तारले.

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी बाजारातून (Indian Equity Market) पलायन केले. त्यांनी जवळपास 5,900 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढले. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी हा प्रताप केला. अर्थात या कृतीमागे भीती आहे.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय इक्विटी बाजाराविषयी सतर्क झाले आहे. कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे इक्विटी रिसर्च प्रमुख श्रीकांत चौहान यांनी या घडामोडींवर मत मांडले. त्यांनी यामागची कारणं विषद केली.

हे सुद्धा वाचा

चौहान यांच्या मते, येत्या काही दिवसात भारतीय सकल राष्ट्रीय उत्पादनाविषयीची (GDP) चिंता, केंद्रीय बँकेचे धोरण, व्याजदरातील वृद्धी आणि तिसऱ्या तिमाहीतील कमाई होण्याचे संकेत, या दरम्यान परदेशी पाहुण्यांचे अस्थिरतेचे धोरण कायम राहणार आहे.

डिपॉजिटरीच्या आकड्यानुसार, FPI ने नवीन वर्षात शेअर बाजाराकडे पाठ फिरवली. 2-6 जानेवारी दरम्यान त्यांनी शेअर बाजारातून 5,872 कोटी रुपये काढले.  गेल्या 11 दिवसांपासून विक्री करत आहे. त्यामुळे एकत्रित विक्री 14,300 कोटी रुपयांवर पोहचली आहे.

आकड्यांवर नजर टाकता, परदेशी पाहुण्यांनी सरत्या वर्षात 2022 मध्ये भारतीय इक्विटी मार्केटमधून 1.21 लाख कोटी रुपये काढले. तर डिसेंबरमध्ये 11,119 कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये 36,239 कोटी रुपये बाजारात ओतले होते. त्यानंतर आता ते पलायन करत आहेत.

जगभरातील केंद्रीय बँकांचे आक्रमक धोरण, परिणामी व्याजदरातील वृद्धी, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे धोरण, कच्चा तेलातील चढ-उतार, रशिया-युक्रेनचे युद्ध, वायदे बाजारावर झालेला विपरीत परिणाम या सर्वांचा परिपाक या पलायनवादामागे आहे.

भारतातून काढलेला पैसा, परदेशी गुंतवणूकदार चीन आणि युरोपियन देशांमध्ये गुंतवत आहेत. त्याठिकाणी त्यांना चांगला फायदा मिळत आहे. अर्थात या घडामोडींचा भारतीय गुंतवणूकदारांना फायदा होईल. त्यांना कमी किंमतीत शेअर खरेदी करता येतील आणि त्यावर कमाईची संधी शोधता येईल.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.