अखेर मोठ्या वादानंतर अशनीर ग्रोवर यांनी BharatPe चा राजीनामा दिला, वाचा संपूर्ण प्रकरण नेमके काय?

| Updated on: Mar 01, 2022 | 11:20 AM

भारतपे (BharatPe) चे सह-संस्थापक अशनीर ग्रोवर यांनी कंपनी आणि बोर्डाचा राजीनामा दिला आहे. अशनी ग्रोवर यांची एक ऑडिओ क्लिप (Audio clip) काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झाली होती. जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व प्रकरण सुरू होते.

अखेर मोठ्या वादानंतर अशनीर ग्रोवर यांनी BharatPe चा राजीनामा दिला, वाचा संपूर्ण प्रकरण नेमके काय?
अशनीर ग्रोवर यांचा भारतपेचा राजीनामा
Follow us on

मुंबई : भारतपे (BharatPe) चे सह-संस्थापक अशनीर ग्रोवर (Ashneer Grover)  यांनी कंपनी आणि बोर्डाचा राजीनामा दिला आहे. अशनी ग्रोवर यांची एक ऑडिओ क्लिप (Audio clip) काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झाली होती. जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व प्रकरण सुरू होते. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्यासोबत अशनीर ग्रोवर हे गैरवर्तन करत असल्याचा आरोप केला जात आहे.

ईमेल करत दिला ग्रोवर यांनी राजीनामा

भारतपेचे व्यवस्थापकीय संचालक ग्रोवर यांनी फिनटेकच्या बोर्डाला दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. पुढे ग्रोवर लिहितात की, मी हे जड अंतःकरणाने लिहित आहे. कारण आज मला एका कंपनीचा निरोप घेण्यास भाग पाडले जात आहे, ज्याचा मी संस्थापक आहे. मी मान उंच करून सांगू इच्छितो की आज ही कंपनी फिनटेकच्या जगात आघाडीवर आहे.

2022 च्या सुरुवातीपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर काही लोकांकडून अनेक खोटे आरोप सतत केले जात आहेत. यामुळे माझ्या प्रतिष्ठेला तर धक्का बसला आहेच पण कंपनीची प्रतिष्ठाही खराब झाली आहे. ग्रोवर म्हणाले की, भारतीय उद्योजकतेचा चेहरा म्हणून ओळखले जात असल्याने, तो आता आपले गुंतवणूकदार आणि व्यवस्थापन यांच्याविरुद्ध दीर्घ, एकाकी लढाई लढण्यात आपला वेळ वाया घालवत आहे. “दुर्दैवाने या लढ्यात व्यवस्थापनाने खरोखर खूप काही गमावले – भारतपे.

अखेर दिलासा नाहीच मिळाला

इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (SIAC) ने कंपनीमध्ये चालू असलेल्या ‘गव्हर्नन्स रिव्ह्यू’ विरोधात गेल्या आठवड्यात ग्रोवरची याचिका फेटाळल्यानंतर ग्रोवरचा राजीनामा आला आहे. यापूर्वी भारतपेने अशनीर ग्रोवरची पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली नोकरीवरून काढून टाकले होते. माधुरी जैन या भारतपे येथील नियंत्रण प्रमुख होत्या. अंतर्गत तपासणीत फिनटेक प्लॅटफॉर्मवर असताना निधीचा गैरवापर झाल्याचे उघड झाले.

संबंधित बातम्या : 

घराचे बजेट कोलमडले….आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, जाणून घ्या नेमक्या कोणत्या वस्तू महागल्या!

LPG Gas Cylinder Price: गॅस सिलिंडर 105 रुपयांनी महागला, येथे जाणून घ्या नवीन दर!