Investment : परदेशी गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावर भरवसा नाय काय? का काढतायेत पैसा..

Investment : परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा शेअर बाजारावर अविश्वास दाखवला आहे..बाजारातून त्यांनी इतके कोटी काढून घेतले आहे.

Investment : परदेशी गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावर भरवसा नाय काय? का काढतायेत पैसा..
भागम भागImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 7:07 PM

नवी दिल्ली : परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) अविश्वास दाखवला आहे. या गुंतवणूकदारांची (Investors) ही पलायनवादी भूमिका नवख्या गुंतवणूकदारांची रक्कम हिरावते. बाजारावर त्यांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे अनेक शेअर घसरतात. बाजारातून हे गुंतवणूकदारा का काढता पाय घेत आहेत, ते पाहुयात..

या परदेशी पाहुण्यांनी भारतीय बाजारातून (Indian Stock Market) सप्टेंबर महिन्यात 7600 कोटी रुपये काढून घेतले तर या वर्षी 2022 मध्ये एकूण 1.68 लाख कोटी रुपये काढले. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळातही हे पाहुणे भारतीय बाजारात फार काळ तग धरणार नाहीत. ते त्यांची रक्कम काढून पोबारा करतील.

आता हा पलायनवाद कशामुळे सुरु आहे, त्याची कारणे काय आहेत, ते पाहुयात. कोटक सिक्युरेटीजचे प्रमुख श्रीकांत चौहान यांच्या माहितीनुसार, डॉलर सध्या मजबूत स्थितीत आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक आणि ब्रिटिश सरकारची धोरणे जागतिक बाजारावर परिणाम करतात. त्यामुळेच इक्विटी बाजाराकडे परदेशी पाहुण्यांनी पाठ केली आहे.

हे सुद्धा वाचा

प्राप्त आकड्यानुसार, एफपीआयने सप्टेंबरमध्ये 7,624 कोटी रुपये मूल्यांच्या शेअर्सची विक्री केली आहे. याअगोदर त्यांनी ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारातून 51,000 रुपयांची तर जुलै महिन्यात हा आकडा अत्यंत कमी म्हणजे 5,000 कोटी रुपये मूल्यांच्या शेअर्सची खरेदी केली होती.

यापूर्वी मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने 9 महिने विक्रीचे सत्र सूरु ठेवले होते. ऑक्टोबर 2021 ते जून 2022 या काळात गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढता पाय घेतला होता. त्यांना भारतीय बाजारावर विश्वास नव्हता. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते.

रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि डॉलर मजबूत होत असल्याने परदेशी गुंतवणूकदारांचे मन विचलीत झाले आहे. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात शेअर्सची विक्री करत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.